जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सोमवारी रक्तदान व कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन

मुखेड : (दादाराव आगलावे)येथील अल्पावधीतच सामाजिक कार्याने नावलौकिकास आलेल्या जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सोमवारी दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान व कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन आयोजन, संगमेश्वर डेंटल क्लिनिक, पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे केली आहे. जिप्सी मॉर्निंग ग्रुपने यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. रक्तदान शिबिरे, गोरगरीबांना मदत व उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात जिप्सी मॉर्निंग ग्रुप सतत अग्रेसर राहिलेला आहे. सोमवार
  • जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य  डॉक्टर सतीश बच्चेवार  यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विपीन इटनकर हे राहणार असून गणाचार्य मठ संस्थान मुखेड चे डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज व बारूळ मठ संस्थान चे नामदेव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार काशिनाथ पाटील, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर तहाडे, मुख्याधिकारी महेश हांडे, गट शिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे, डॉ. अशोक कौरवार, गणाचे अध्यक्ष डॉ. व्यंकट सुभेदार, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल मुक्कावार, आयएमएचे सचिव डॉ. रामराव श्रीरामे, वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉ.पांडुरंग श्रीरामे यांची उपस्थिती राहणार आहे.

सदरील कार्यक्रमात जिप्सी भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी विपीन इटनकर व मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

सदरील शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे, विद्यमान अध्यक्ष शेखर पाटील, सचिव बालाजी तलवारे, कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे, कोषाध्यक्ष वैजनाथ दमकोंडवार, उपाध्यक्ष किशोर चौहाण,जय जोशी, भास्कर पवार, नामदेव श्रीमंगले यांच्यासह जिप्सीयन्सनी केले आहे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *