कंधार
सध्याच्या कोविड परिस्थितीत शासन नियमाचे पालन करुन मतदार दिनाच्या औचित्यानेच मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत तहसील कार्यालय कंधारच्या वतीने भित्तिपत्रक आणि आकाश कंदिल स्पर्धा हु.माणिकराव काळे रोडवर असलेल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या मातृशाळेत म्हणजे, श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे दि.२० जानेवारी २०२२ रोजी झाली.या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी आदरणीय शरदजी मंडलिक यांनी केले.प्रमुख पाहूणे तहसीलदार आदरणीय संतोषजी कामठेकर यांच्या उपस्थितीत मातोश्री मुक्ताई धोंडगे सांस्कृतिक कला मंडपात स्पर्धेस आरंभ झाला.
मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे आभार मानल्या नंतर स्पर्धेस सुरुवात झाली. या प्रसंगी उपमुख्याध्यापक डी.पी.कदम ,पर्यवेक्षक रमाकांत बडे व तुकाराम कारागीर यांचे सहित प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधु-भीगीनी उपस्थित होते. स्पर्धेचे पर्यवेक्षक चिंतेवार मॅडम व शिरसे मॅडम यांनी केले.परिक्षक धोंडगे मॅडम व दत्तात्रय एमेकर यांनी केले.उत्कृष्ट सुत्रसंचलन उपप्राचार्य प्रा.सदानंद कांबळे केले.
मतदार दिनाच्या औचित्याने तहसील कार्यालय कंधारच्या वतीने घेण्यात आलेल्या मतदार जनजागृती अभियान अंतर्गत भित्तिपत्रक व आकाश कंदिल स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत
भित्तिपत्रक स्पर्धेत यशस्वी स्पर्धक
प्रथम-कु.श्रृती गिरीश एमेकर.
व्दितीय-कु.आर्या नरेंद्र राठोडकर
कु.शुभांगी जनार्दन केंद्रे
तृतीय-कु.नंदीनी दिनेश व्यास
कु.शुभदा हनमंत मुसळे
प्रोत्साहनपर
कु.शारदा सुभाष कोटाळे
कु.प्रेरणा बाबुराव पानपट्टे
कु.ऐश्वर्या प्रल्हाद मंगनाळे
कु.सुवर्णा ज्ञानोबा केंद्रे
कु.सह्याद्री सुभाष कोटाळे
कु.श्रेया गिरीश एमेकर
आकाश कंदिल स्पर्धेत यशवंत
प्रथम-कु.सुवर्णा ज्ञानोबा केंद्रे
व्दितीय-कु.श्रीया अंगद सुकणे
तृतीय-कु.आर्या नरेंद्र राठोडकर
सिध्देश्वर जनार्दन केंद्रे
या सर्व स्पर्धकांच्या कलाकृती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यासाठी कंधारचे तहसीलदार आदरणीय संतोष कामठेकर यांच्या सुपुर्द करतांना पर्यवेक्षक रमाकांत बडे सर आणि स्पर्धेचे प्रमुख दत्तात्रय एमेकर सर ही क्षणचित्रे विशाल पेठकर यांनी टिपली आहेत.
यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक व संचालक- माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब, सचिव-माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब, अध्यक्ष-डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब, सहसचिव अॅड मुक्तेश्वरारावजी धोंडगे साहेब शालेय समिती अध्यक्षा लिलाताई आंबटवाड मॅडम,उपविभागीय अधिकारी शरदजी मंडलिक साहेब,तहसीलदार संतोष कुमठेकर साहेब व मोरे सर आणि मन्मथजी थोटे सर ,मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक डी.पी.कदम सर,पर्यवेक्षक रमाकांत बडे सर व तुकाराम कारागीर सर
यांचे सहित सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु-भगीनींनी अभिनंदन करून मानाची कोटी-कोटी जयक्रांति केली.