नांदेड/प्रतिनिधी-
हैद्राबाद मुक्ती संग्रामातील लढवय्य प.पु. स्वामी रामानंद तीर्थ व प्रख्यात पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन सायं दै. नांदेड वार्ताच्या वतीने जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या दिवंगत नेते व कार्यकर्त्यांचे स्मरण केेले आहे.
या दिनदर्शिकेत प.पु. स्वामी रामानंद तीर्थ, श्यामरावजी बोधनकर, नरहर कुरुंदकर, प्रख्यात पत्रकार सुधाकरराव डोईफोडे, कॉ.अनंतराव नागापूरकर, ऍड.राधाकिशन अग्रवाल, ऍड.एल.बी. देशमुख, सदाशिवराव पाटील, नारायणराव चिद्रावार, गोवर्धन डोईफोडे, भगिरथ शुक्ला, पद्माकरराव लाठकर, सुंदरसिंघ हुजुरीया, माजी आ.पी.जी.दस्तूरकर आदी नेत्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा मांडला आहे.
या दिनदर्शिकेचे विमोचन नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रा.शामल पत्की, शंतनु डोईफोडे, अनुजा डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सायं दै.नांदेड वार्ताचे संपादक ऍड.प्रदीप नागापूरकर, सहसंपादक अविनाश पाटील, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रफुल्ल अग्रवाल, चिरंजीवीलाल दागडीया, धनंजय डोईफोडे,सूर्यकांत वाणी, प्राचार्य डी.यु.गवई, प्राचार्य आर.एम.जाधव, प्रा. बालाजी कोम्पलवार,प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.