आमदार जितेश आंतापुरकर यांची माजी सैनिक विकास समिती संघटना नांदेड चे शिष्टमंडळाने घेतली भेट ;शहीद जवान कॅप्टन मनोज धाडे यांच्या स्मारकचे शोशोभीकरण करण्याची मागणी

देगलुर

देगलुरचे आमदार जितेश आंतापुरकर यांची आज दि.३० जानेवारी रोजी माजी सैनिक विकास समिती संघटना नांदेड चे शिष्टमंडळाने भेट घेऊन देगलुरचे शहीद जवान कॅप्टन मनोज धाडे यांच्या स्मारकचे शोशोभीकरण करण्यात यावे आणि शहीद जवानाचे भव्य स्मारक बनवुन पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी केली.

तसेच देगलूर तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण व्हावे आशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

आमदार जितेश आंतापुरकर यांनी सदरील मागणीची दखल घेऊन लगेच शोशोभिकरण करु आणि लवकरच पुतळा बसवु आसे आश्वासन दिले.

त्यावेळी मराठवाडा अध्यक्ष नारायण कारामुंगे, जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड,कार्य अधक्षे के के पवार, तालुका अध्यक्ष अर्जून कांबळे,देगलुरचे तालुका अध्यक्ष मारोती भासवाडे , संघटक बापुराव कल्याणकर आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *