कंधार:-
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमातून सर्वसामान्य भारतीयांच्या भावना व्यक्त होतात तर नरेंद्रजी मोदी यांनी युवकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा व भ्रष्टाचार मुक्त भारताकडे वाटचाल करण्याचा संदेश त्यांनी दिला तो तरुणांसाठी व देशवासियांसाठी मैलाचा दगड ठरेल अशी भावना जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे आयोजित कार्यक्रमात केले.
पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित करण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटी घेतला जातो. या वर्षीचा पहिला मन की बात चा कार्यक्रम दि ३० रोजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपचे शहराध्यक्ष अड. गंगाप्रसाद यन्नावार यांच्या उपस्थितीत भारत मातेचे पूजन करून मन की बात या कार्यक्रमास सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली. मन की बात या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलताना प्रवीण पाटील म्हणाले, की आज आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे तरुणांचे खूप मोठे योगदान राहणार आहे.
कोरोना सारख्या महामारी मध्ये कोरोना योद्धा म्हणून तरुणांनी मोठ्या प्रमाणा मध्ये समोर येऊन आपली सेवा बजावली. स्थानिक रोजगारानां प्राधान्य देऊन ' व्होकल फॉर लोकल' या कार्यात आपण सर्वांनी प्रोत्साहन द्यावे,त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे ते यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे बिजेवाडी तांडा येथिल उसाच्या फडात मन की बात कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम जाधव यांनी घेतला, आला यावेळी शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर ,शहर सरचिटणीस मधुकर डांगे,सोशल मीडिया प्रमुख अड सागर डोंगरकर, रजत शहापुरे ,कैलास नवघरे ,परमेश्वर कटकमवार ,माजी नगरसेवक सतीश कांबळे, श्यामसुंदर शिंदे, शेख अमजत ,मोहम्मद जफर, महेश मोरे, गिरमाजी कांबळे, आसिफ शेख ,सुमित गोरे यांची उपस्थिती होती.