फुलवळ येथील महादेव मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्याकडे घालणार साकडे -संतोष पांडागळे


फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

       कंधार तालुक्यातील फुलवळ येथील श्री क्षेत्र महादेव देवस्थान हे जाजवल्य देवस्थान असून खूप जुना वारसा असलेले आणि सर्वदूर परिचित असलेले देवस्थान हे विकासापासून कोसोदूर राहिले असल्याने या मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे साकडे घालून या महादेव देवस्थान ला विकास निधी कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी आज ता. ३० जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात फुलवळवासीयांना दिले.



       नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या माध्यमातून फुलवळ येथील जि. प. कें. प्रा. शाळेत वर्गखोल्या दुरुस्ती साठी दोन लक्ष रुपये निधी देण्यात आला होता. तेच पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण सोहळ्यासाठी उद्घघाटक म्हणून संतोष पांडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    येथील जि. प. शाळेत सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच तुळशीदास रासवंते , गोविंदराव मंगनाळे , बी आर बनसोडे , बसवेश्वर मंगनाळे , नागनाथ गोधने , दिगंबरराव मंगनाळे , बालजीराव मंगनाळे यांची मंचावर उपस्थिती होती. प्रथमतः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . त्यानंतर मान्यवरांचा प्रविण मंगनाळे व संदीप मंगनाळे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

     या लोकार्पण सोहळ्यात शाळेच्या दुरुस्ती साठी संजय बेळगे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे गावकऱ्यांनी आभारही व्यक्त केले. आणि काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी मध्यस्ती करून पालकमंत्र्याकडे आमच्या काही मागण्या आहेत त्या पोहचवाव्यात आणि त्यासाठी आपण पाठपुरावा करावा असा आग्रह फुलवळकरांनी यावेळी केला त्यात प्रामुख्याने निजामकालीन बांधकाम असलेली या जि. प. शाळेची इमारत जीर्ण झाली असून येथे नवीन इमारत मंजूर करावी , महादेव देवस्थान ला तीर्थक्षेत्र चा दर्जा मिळवून द्यावा तसेच जुनेगावठाण येथील शाळेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन सभागृह , संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली , त्यावरून संतोष पांडागळे यांनी वरील आश्वासन देत उर्वरित कामांसाठीही नक्कीच पाठपुरावा करू असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

      यावेळी संभाजी मंगनाळे , आनंदा पवार , संजय फुलवळे , गंगाधर शेळगावे , कामाजी मंगनाळे , संभाजी डांगे , मारोती मंगनाळे , ग्यानोबा मंगनाळे , महमदू शेख , पत्रकार परमेश्वर डांगे , मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते , दिगंबर डांगे , धोंडीबा बोरगावे , मंगेश पांचाळ , रामलिंग मठपती , भगवान मंगनाळे , दत्ता डांगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *