कंधारः
बहाद्दरपुरा ता.कंधार येथील माणिक(मनोज) माधवराव पेठकर हे वनस्पतीशास्त्र(लाईफ सायन्स) विषयात राज्यस्तरीय पात्रता परीक्षा(सेट)उत्तीर्ण झाले आहेत.सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी या परीक्षेचे आयोजन केले होते.महाराष्ट्र व गोवा राज्यात या परीक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये १५ शहरातील २२० केंद्रावर पार पडल्या.माणिक पेठकर यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण श्री.शिवाजी कॉलेज, कंधार, पदवी पर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालय ,नांदेड व पदव्युत्तर शिक्षण सायन्स कॉलेज,नांदेड येथे झाले.सेट परीक्षेची तयारी त्यांनी पुणे येथे आयफास शिकवणी वर्गात केली.नुकत्ताच परीक्षेचा निकाल लागला आहे.त्यात माणिक पेठकर उत्तीर्ण झाले.श्री.शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी,कंधारचे उपाध्यक्ष तथा बहाद्दरपुरा गावचे माजी सरपंच माधवराव पेठकर यांचे ते सुपुत्र आहेत.
माणिक पेठकर हे वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ,कंधारचे संस्थापक व संचालक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डॉ. भाई केशवराव धोंडगे, संस्थेचे सचिव तथा माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरूडे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरूषोत्तमराव धोंडगे, सहसचिव अँड.मुक्तेश्वरराव धोंडगे, प्राचार्य डॉ. अशोक गवते,प्राचार्य डॉ. जी.आर.पगडे, प्रा.चित्राताई पाटील लुंगारे ,माजी उपसरपंच पंडीत पा.पेठकर, गुरूनाथ पेठकर,उत्तम भांगे, प्रो.डॉ. गंगाधर तोगरे, प्रा.जिजाभाऊ रोडगे ,प्रा.डॉ. माधव कदम प्रा.डॉ. डी.डी.पवार,प्रा.डॉ. सुभाष रगडे ,प्रा.डॉ.संतोष राठोड, प्रा.संतोष गुटे, प्रा.डॉ. विजया साखरे आदीनी कौतुक केले.