फुलवळ ; विशेष प्रतिनिधी
याच बैठकीत सर्वांनी आपापल्या विचारांची देवाणघेवाण करत फुलवळ व्यापारी संघाची पहिली कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार पहिले अध्यक्ष म्हणून प्रविण मंगनाळे यांची तर पहिले सचिव म्हणून धोंडीबा बोरगावे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग व एक राज्य महामार्ग असे दोन मुख्य रस्त्यावर आले असल्याने भविष्याचा विचार करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी फुलवळ मध्ये आठवडी बाजार भरवावा अशी धोंडीबा बोरगावे यांनी नुकतीच ग्राम पंचायत कडे मागणी केली असून त्यादृष्टीने आज ना उद्या फुलवळ मध्ये आठवडी बाजार भरणारच यात दुमत नसून त्यासाठी गावातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी एकत्रित येणे व व्यापाऱ्यांचे संघटन होणे आवश्यक असल्याचे मत धोंडीबा बोरगावे यांनी व्यक्त केले होते .
त्यामुळे येथीलच कांही तरुण व्यवसायिकांनी त्यात धोंडीबा बोरगावे , परमेश्वर डांगे , कैलास फुलवळे , दत्ता डांगे , वसंत मंगनाळे यांनी पुढाकार घेत गावातील सर्व व्यापाऱ्यांना चर्चा करण्यासाठी एकत्रित यावे व बैठकीचे आयोजन करावे असे मत मांडल्याने त्यांच्या हाकेला ओ देत गावातील जवळपास ८० ते ९० अशा सर्व छोटे मोठे व्यवसायिक व्यापाऱ्यांनी फुलवळ येथील जाज्वल्य देवस्थान म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या श्री क्षेत्र महादेव मंदिर देवस्थान येथे ता. ३० जानेवारी रोजी बैठक घेतली आणि फुलवळ व्यापारी संघाची पहिली कार्यकारणी जाहीर केली.
त्यात अध्यक्ष , सचिव बरोबरच कार्याध्यक्ष पदी परमेश्वर डांगे , उपाध्यक्ष म्हणून कैलास फुलवळे , कोषाध्यक्ष निळकंठ मंगनाळे , सहसचिव गणेश मंगनाळे , संघटक शादुल शेख , सल्लागार आनंदा पवार , सदस्य दत्ता डांगे , अखिल बिछु , भगवान गोधने , धोंडीबा फुलवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून यांच्यासह सर्व इच्छुक व्यापारी या संघाचे सन्माननीय सदस्य असणार आहेत.