नांदेड,31-
वर्षाताई भोसीकर यांनी 2013 मध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त फुलवळ येथील अंगणवाडीतील 33 कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. नांदेड जिल्ह्यातील कुपोषण मुक्ती चळवळीची सुरुवातच वर्षाताई भोसीकर यांनी आपल्या वाढदिवसापासून सुरुवात केली होती. तेव्हापासून त्या दरवर्षी आपला वाढदिवस कुपोषित बालका समवेत साजरा करत असतात.
परंतु गत दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे अंगणवाडया बंद आहेत. त्यामुळे विविध सामाजिक उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. मागच्यावर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त कोवीडमध्ये उल्लेखनीय काम करणार्या ग्रामीण रुग्णालय कंधार येथील सर्व डॉक्टर व कर्मचा-यांचा सन्मान करुन रुग्णांना फळ वाटप केले.
यावर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त शहरातील बेघर, निराधार नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करून जेवन दिले. आगामी काळातील माझे वाढदिवस अश्याच सामाजिक उपक्रमांनी साजरे करु. कुपोषणमुक्तीचा घेतलेला वसा यापुढेही अखंड चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.