कंधार प्रतिनिधी -माधव गोटमवाड
महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविन्यात येत आहे.
हळदी कुंकू साठी मंडोदराबाई घुगे ,रूक्मीणीबाई केंद्रे,जनाबाई घुगे ,लक्ष्मीबाई गोटमवाड, शिवकांता करेवाड यांच्यासह गावातील आलेल्या बहुसंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
डॉक्टर श्याम पाटील तेलंग हॉस्पिटल नांदेड यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेली होती तरी या शिबिरात 60 ते 70 लोकांनी आपली डोळे तपासणी करून घेतले ज्यांना मोतीबिंदू आहेत त्यांना अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया नांदेड शाम पाटील तेलंग हॉस्पिटल येथे करण्यात येईल या शिबिरासाठी नेत्र तंत्रज्ञ शेख यांनी डोळ्याची तपासणी केले.
शिबीराचे आयोजन ज्ञानोबा घुगे रा.काँ.पा.ओ.ता.अ.कंधार यांच्या नियोजनाखाली घेतले.
नेत्र शिबिरासाठी उपस्थित ज्ञानोबा घुगे, चक्रधर घुगे ,भानुदास मो.घुगे, कोडींबा करेवाड,संदिप चव्हाण,भानुदास रा.घुगे ,परमेश्वर घुगे,स्वपनील राठोड,वैजनाथ घुगे,यांच्या ऊपस्थीतीत नेत्र शिबिर संपन्न झाले.