सौ.वर्षाताई भोसीकर जिजाऊ सावित्री रत्न पुरस्काराने सन्मानित

कंधार दिनांक 21 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना जिजाऊ सवित्री रत्न पुरस्काराने दैनिक युवाराज्य व आजाद ग्रुपच्या वतीने नांदेड येथे सन्मानित करण्यात आले.
जिजाऊ सावित्री जयंती महोत्सवानिमित्त दैनिक यूवा राज्य व आझाद ग्रुप च्या वतीने जिजाऊ सावित्री जयतींचा उत्सवामध्ये कर्तुत्तवान महिलांचे लेख प्रकाशित करण्यात येऊन अशा महिलांना जिजाऊ सवित्री रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्कारासाठी सौ. वर्षाताई भोसीकर यांच्या कार्याची दखल घेत निवड करण्यात आली.

  दिनांक 20 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे एका सोहळ्यामध्ये हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कंधार पंचायत समिती च्या पहिल्या महिला उपसभापती ते जिल्हा परिषद सदस्या या कार्यकाला मध्ये व आजतागायत चालू असलेल्या त्यांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी ग्रामीण भागामध्ये भागातील लोक चळवळीमध्ये राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्ति अभियान ,ग्रामस्वच्छता अभियान, लेक शिकवा अभियान, वृक्षलागवड,जलसंधारणाची कामे,ग्रामीण आरोग्य शिबिरे, अंगणवाडी डिजिटल, शाळा डिजिटल, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामीण रस्ते आदीसह लोहा तालुक्यातील पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग त्याचबरोबर कोरोना महामारी च्या संकटाच्या काळात लॉकडावुन मुळे बेरोजगार गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप करत अनेक कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असे अनेक असे विविध सामाजिक उपक्रम सौ.वर्षाताई आजही राबवत आहेत या कार्याची दखल घेत दैनिक युवा राज्य चे कार्यकारी संपादक गणेश पाटील शिंदे व आजाद ग्रुप चे भीमाशंकर मामा कापसे यांनी सौ.वर्षाताई यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

नांदेड येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणीताई अंबुलगेकर, नांदेडच्या महापौर सौ.जयश्रीताई पावडे, माजी नगराध्यक्ष सौ.आशाताई चव्हाण,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखाताई कळम पाटील, सौ.ऋतुजा शिंदे सौ.ज्योती कापसे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल सौ. वर्षाताई यांनी आयोजकांचे आभार मानले व या पुरस्कारामुळे माझ्या कार्यास व मला सदैव प्रेरणा मिळेल माझे कार्य यापुढे देखील सदैव चालूच राहिल असे सौ.वर्षाताई भोसीकर म्हणाल्या. यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर,डॉक्टर हंसराज वैद्य,सामाजिक कार्यकर्ते संतोष मुरकुटे,बालाजी पाटील जाधव,माधवराव सुगावकर आदींची आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *