ग्रामसेवकांने माहिती न दिल्यामुळे मुंडेवाडी येथिल शेतकऱ्यांचे पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण

कंधार

ग्रामसेवकांने माहिती न दिल्यामुळे मुंडेवाडी येथिल शेतकरी दिनेश पि. दगडोबा मुंडे रा. मुंडेवाडी ता. कंधार जि. नांदेड यांनी दि२१ रोजी पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण पुकारले आहे

याबाबत सविस्तर निवेदन गरविकास अधिकारी कंधार यां देण्यात आले अपून त्यात असे नमूद केले आहे की
दिनेश पि. दगडोबा मुंडे रा. मुंडेवाडी ता. कंधार जि. नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या मालकी वडीलाच्या नावावर असलेली जमीन गट क्र.-११ मधील ग्रामसेवक श्री तेलंगे यांनी कोणत्याही अधिकृत कागदपत्राशिवाय ही जमीन इतर गावातील व्यक्तीच्या नावे अनाधिकृत पणे घरात बसुन पंचनामा अधारे नांवे लावली आहे.

लावलेल्या जमीनीच्या/जागेच्या नमुना नं.-८ ची साठी कायदेशीर अर्ज करुन दिनांक :२०/११/२०२१ रोजी मागणी केली होती. परंतु त्यांनी अर्ज घेण्यास स्पष्ट पणे नकार दिला व सदरिल माहिती मी तुला देणार नाही असे सांगितले त्यामुळे दिनांक २४/११/२०२१ रोजी माहिती अधिकारी नमुना नं. १ प्रमाणे सदरिल प्रकरणाची माहिती मागीतली होती. पण माननिय ग्रामसेवक तथा माहिती अधिकार साहेबांनी मला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.

त्यानंतर मी दिनांक २९/१२/२०२१ रोजी माहिती अधिकार अर्ज क्र. २ अपिलाप्रमाणे संबंधित माहिती पंचायत समिती कार्यालयाकडे मा. विस्तार अधिकारी पं.स. यांच्याकडे केला असता यावेळी सुनावनी घेण्यात आली. यात अपिलीय अधिका-यांनी संबंधित ग्रामसेवकास अपिलाप्रमाणे अर्जदाराने मागितलेली पुर्ण पणे माहिती विना शुल्क -५ दिवसाच्या आत देण्यात यावी.

असे लेखी आदेशात देऊन सुध्दा संबंधित ग्रामसेवक तथा जन माहिती अधिकारी श्री तेलंगे हैं मज अर्जदारास जाणीवपूर्वक माहिती देत नाहीत. व विनाकारण मला त्रास देत आहेत.

श्री तेलंगे हे श्री गुट्टे साहेब विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान केलेला असल्यामुळे यांच्यावर मा. गटविकास अधिकारी साहेबांनी योग्य ते कार्यवाही करुन मला तात्काळ स्वरुपात माझ्या मुळ जमीनीच्या ग्रामपंचायत कार्यालय मुंडेवाडीच्या नमुना नं.-८ ला लावण्यात आलेला उतारा-याची प्रत साक्षांकित प्रत अधिकृतपणे मला देऊन सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *