फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज म्हणजे ग्रामीण भागातील एक नावाजलेले विद्यालय आहे. शैक्षणिक संस्थेचे उद्दिष्ट साध्य करणाऱ्या ज्या काही मोजक्या शाळा नांदेड जिल्ह्य़ात आहेत त्यापैकी एक शाळा म्हणून या हायस्कूलकडे पाहिल्या जाते.
सन १९८९ साली जे विद्यार्थी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होते. त्यांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला होता. सुमारे ९० % सवंगड्यांनी एकत्र येऊन रविवारच्या दिवशी पुन्हा शालेय जीवनाचा मनमुराद आनंद लुटला.
सकाळी ठीक १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली , छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास आरंभ करण्यात आला. सर्व सवंगड्यांनी आपापल्या भावना व्यक्त करताना शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
केवळ गुणात्मक नव्हे तर जीवन जगण्यासाठी आवश्यक मुल्यांची जोपासना याच शाळेत झाल्याची भावना व्यक्त होत होत्या. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा व समाजकारण या क्षेत्रात एक वेगळी छबी उमटविलेली आहे.
याचे श्रेय तत्कालीन गुरुजनांना जाते.
बहुसंख्य मुली देखील उपस्थित होत्या. बहीण- भावांच्या पवित्र नात्याचे दर्शन येथे घडत होते. सर्व मुलांनी भाऊबीज म्हणून साडी देवून मुलींचा यथोचित सन्मान केला. सर्वांना रुचकर जेवण देण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या पराक्रम हा सदैव प्रेरणादायी असल्याने शाळेला भेट म्हणून एक आकर्षक पुतळा देण्यात आला.
मागील काळात ज्या शिक्षकांचे व सवंगड्यांचे दुःखद निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गेट टुगेदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मागील एक महीन्यापासून पांडुरंग कंधारे , रावसाहेब राजे, माधव शिंदे, नागोराव जोगदंड, गोविंद केंद्रे आदिंनी परिश्रम घेतले.