कंधार
कंधार चे प्रभारी तहसीलदार म्हणून संतोष कामठेकर यांच्याकडे पदभार दिला होता त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी २८ फेब्रुवारी रोजी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.

सहाय्यक कार्तिकेयन एस. यांनी अर्धापूर येथे यापुर्वी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तर कंधार येथे २८ फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या कामाची अपेक्षा केली जात आहे. तसेच कार्यालयीन स्वच्छ कारभाराची ही अपेक्षा केली जात आहे.

खावेळी संतोष कामठेकर ,
नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, नायब तहसिलदार पाठक, अव्वल कारकून पानपट्टे, लिपिक केदार, मन्मथ थोटे यांच्यासह तहसिल कर्मचारी उपस्थित होते.


