कंधार
लिंगायत बांधवाच्या जागेसमोरील अतिक्रमण त्वरित हाटऊन मा. चंद्रकांत बारादे यांना त्वरित न्याय द्या.
सूड भावनेतून लिंगायत बाधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या. लिंगायत बांधवाना जातीवाचक शिव्या आणि सतत मानसिक त्रास देण्याऱ्या गावगुंडांचा त्वरित बंदोबस्त करा.
राउतखेडा सहित कंधार तालुक्यात लिंगायत बाधवांवर होणारी दहशत त्वरित थांबवा. या प्रमुख मागण्यासाठी आज सोमवार दि.२८ फेब्रवारी रोजी कंधार तहसिलवर बसब ब्रिगेड चा मोर्चा काढण्यात आला होता.
राऊतखेडा येथील चंद्रकांत बारादे यांनी मागील एक वर्षांपासून त्यांचे जागेसमोर होत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमाबाबत तक्रार केली आहे आणि त्याविषयी पोलीस, संबंधित खाते कडे दाद मागितली आहे.

या तक्रारींची दखल न घेता त्याच ठिकाणी पुन्हा-पुन्हा अतिक्रमण करून चंद्रकांत बारादे यांना व त्यांच्या कुटुंबियाना मानसिक त्रास देत आहेत. त्यांच्यावर होणारा अन्याय निंदनीय आहे.दरम्यानच्या काळात चंद्रकांत बारादे सहित इतर 68 लिंगायत बाधवांवर,कसलेही कारण नसताना, खोटे गुन्हे दाखल करून दहशत दाखवण्याचा प्रकार घ्रणास्पद आहे.
लिंगायत समाजावर होणाऱ्या अन्यायाचे बसव ब्रिगेड तीव्र शब्दात निषेध करते आणि यापुढे या प्रकरणात न्याय देण्यात कसल्याही प्रकारचा दिरंगाई बसव ब्रिगेड सहन करणार नाही. असा इशारा यावेळी निवेदन देवून देण्यात आला.
यावेळी अविनाश भोसीकर, सचिन पेठकर, महेश भोसीकर, पिंटू मंगनाळे, बाळासाहेब शिंदगे, एकनाथ विश्वासराव, श्याम पाटील,
सतिश कल्याण कस्तुरे , मारोती मामा गायकवाड, राजू मळगे, नवनाथ वाखरडकर , शेख दस्तगीर
संगम होनराव, बाळू फिसके सह समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.
