शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले -इतिहासकार प्रा. गोविंदराव जाधव


मुखेड : (दादाराव आगलावे)


आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २ हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर तसेच शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहासकार प्रा. गोविंदराव जाधव यांनी केले.


तालुक्यातील वर्ताळा येथे शिवजन्मोत्सवानिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेषराव गुरुजी डावकरे होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. सायंकाळी छत्रपतींच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली.

इतिहासकार प्रा. गोविंदराव जाधव पुढे म्हणाले की, किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी, आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असे. शहाजी राजाची सुटका, मोऱ्यांचे उच्चाटन, अफजलखानाचा पराभव, स्वतःची पन्हाळ्याहून सुटका, विशाल गडावरच्या चकवा, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते. प्रा. जाधव यांनी ‘शिवाजीराजे समजून घेऊया’ या विषयावरती मुद्देसूद मांडणी करताना बरेचशे चोमांचक उदाहरणे देत वर्ताळवाशीयांना मंत्रमुग्ध केले.

अध्यक्षीय समारोप करताना शेषराव गुरुजी डावकरे म्हणाले की, शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे ढोल ताशा वर किंवा डीजे वर नाचणे नसून महाराजांचा एखादा तरी विचार आपण स्वीकारावा म्हणजे शिवजयंती केल्याचे सार्थक होईल. संयोजन समितीने शिवजयंती मोठ्या थाटामाटात केल्याने शेषराव गुरुजी यांनी संयोजन समितीचे अभिनंदन केले. यावेळी माऊली आगलावे, कमलकिशोर कदम, श्रुती डावकरे, संध्याराणी श्रीकंटे या शालेय विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक राजेंद्र गुरुजी वर्ताळकर यांनी केले.

कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचालन उपकृमशील शिक्षक बळवंत डावकरे यांनी केले तर आभार भारत गुरुजी जायेभाये यांनी मानले. शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रमेश डावकरे, बळवंत डावकरे, प्रभाकर डावकरे, आनंद गुरुजी आगलावे, अविनाश पुरी, विष्णू आगलावे, साईनाथ आगलावे, उमेश डावकरे, रघुनाथ गव्हाणे, पांचाळ, रईस शेख, अविनाश डावकरे, बबलू कागणे, एकनाथ डावकरे, सुभाष जायेभाये, दत्ता डावकरे, अंगद डावकरे, मन्मथ उळागड्डे, लक्ष्मण डावकरे, हरी डावकरे, उदय आगलावे, किशोर आगलावे, मधुकर डावकरे, प्रशांत डावकरे, प्रताप डावकरे, परमेश्वर डावकरे, तुळशीराम कागणे, ईश्वर डावकरे, उद्धव डावकरे, राम आगलावे, विशाल आगलावे, नामदेव खंडगावे, अंगद काटापल्ले, अमित आगलावे, सदानंद आगलावे,

मारोती तेलंगसह अनेकांनी परिश्रम घेतले. संयोजन समितीचे अविनाश पुरी, विष्णू आगलावे, अविनाश डावकरे, बबलू कागणे, रईस शेख साईनाथ आगलावे यांनी विशेष परिश्रम घेतले. व्याख्यानमालेच्या कार्यक्रमास पदाधिकारी, ग्रामस्थ पुरुष, महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *