परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन ; 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बनवले प्रकल्प

पेठवडज: 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून येथील भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ देवईचीवाडी संचलित परफेक्ट इंग्लिश स्कूल येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कंधार मुखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट डॉक्टर तुषारजी गोविंदराव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठवडज नगरी च्या सरपंच सौ अनिता ताई दत्तात्रय गायकवाड उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष माननीय भालचंद्र नाईक साहेब, भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ देवळी ची वाडी या संस्थेचे अध्यक्ष माननीय गिरधारी जी केंद्रे सर, पेठवडज ग्रामपंचायत सदस्य माननीय नारायण गायकवाड पंचायत समिती सदस्य कंधार आम्रपाली राजरत्न कदम पेठवडज चे माजी सरपंच श्याम महाराज जोशी पेठवडज चे उपसरपंच श्री खुशाल राजे आणि संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय चे सचिव श्री देविदास सरजी कारभारी आणि परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज चे सचिव माननीय श्री गोविंद दादा केंद्रे या सर्वांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे उद्घाटन थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले सी वी रमन यांच्या रमन इफेक्ट ला नोबल पारितोषक मिळाल्या त्यानिमित्ताने पूर्ण देशभर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज येथे बाल शास्त्रज्ञांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक कंधार मुखेड मतदार संघाचे आमदार श्री तुषार जी राठोड यांनी आपल्या बालपणीच्या उदाहरणातून वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले आणि विज्ञान प्रदर्शनातील बाल शास्त्रज्ञांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात नावीन्यपूर्ण साहित्य केले.  प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रतिकृती व रांगोळीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जेची निर्मिती व त्याचे फायदे याविषयी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात नावीन्यपूर्ण साहित्य केले.

त्यांचा दैनंदिन जीवनात वापर झाला पाहिजे, प्लॅस्टिकचा वापर करू नये, टिकाऊ व विना खर्चिक वस्तूंची निर्मिती करून इतरांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक रांगोळी काढून त्याच्यातून विज्ञान संदेश देण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये कृषीवर आधारित प्रकल्प, सौर उर्जेवर आधारित प्रकल्प, विज्ञान आणि तंत्रज्ञान, काही घरगुती उपयुक्त प्रकल्प ,असे बरेच प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवून प्रदर्शनामध्ये एक वेगळीच भर टाकली होती. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 70 पेक्षा जास्त प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवले होते. ग्रामीण भागात उच्च दर्जाचे शिक्षण देणारी एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे परफेक्ट इंग्लिश स्कूल ही ओळख अगोदरच्या या शाळेने निर्माण केलेली आहे त्यामध्ये आणखी एक भर म्हणजे विविध उपक्रम घेणारी सुद्धा ही शाळा एकमेव ठरलेली आहे.

विज्ञान प्रदर्शन या बरोबरच शाळेमध्ये वार्षिक पालक मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे पालकांसाठी जणू पर्वणीच ठरली होती. आपल्या पाल्याचा उपक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालकांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा विनायक पवार मॅडम यांच्या प्रयत्नातून हा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी पार पडला. संस्थेचे अध्यक्ष श्री गिरिधारी जी केंद्रे सर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वृंद यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *