कंधार दि 28 फेब्रूवारी ( प्रतिनिधि)
सिध्देश्वर महादेव मंदिर पानभोसी परिसरामध्ये गावातील निसर्ग सेवा मंडळाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून वृक्ष लागवड करण्यात येते होती परंतु बोअर चे पाणी संपल्यामुळे निसर्ग मंडळाच्या वतीने संजय भोसीकर यांना नळ योजना करून देण्याबाबत विनंती केली असतां तात्काळ स्वतःच्या मळ्यातुन स्वखर्चाने महाशीरात्री च्या अगोदर नळ योजना करून पाणी महादेव मंदिर परिसरात आणून दिले या नळ योजनेचे उदघाटन व लोकार्पण दिनांक 27/02/2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री.श्री.श्री 108 डॉ.नंदिकेश्वर शिवार्चाय महास्वामी, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर,सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जी.प सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर,सरपंच सौ.राजश्रीताई भोसीकर, कृष्णाभाऊ भोसीकर, बहादरपुरा चे उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर सरपंच प्रतिनिधी विजय गायकवाड उत्तमराव भोसीकर,निसर्ग सेवा मंडळाचे शिवसांब घोडके, अशोक पाटील भोसीकर, बळवंत पाटील भोसीकर, विश्वंभर पांचाळ, शिवराज पाटील भोसीकर, मन्मथ नाईकवाडे,पोलीस पाटील शेख इसाक,शिवाआप्पा स्वामी, बालाजी पाटील डोम,ज्ञानेश्वर घोडके सर शेख बाबू साहेब, उत्तमराव नाईकवाडे, शंकरराव घोडके, हरिभाऊ नाईकवाडे, गंगाधर डोम,बालाजीराव नाईकवाडे, माधव स्वामी, देवराव पाटील नाईकवाडे, विठ्ठलराव गौंड,भाऊराव पाटील,नारायण भोसीकर, अविनाश भोसीकर,शिवदास नरंगले, नागेश नाईकवाडे,राजकुमार भोसीकर,शेख निजाम,आदीसह गावातील नागरिक
सिध्देश्वर महादेव मंदिर हे पानभोसी व पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध व पुरातन असलेल्या मंदिर असुन भाविकांचे श्रद्धास्थान आहे या परिसरात निसर्ग सेवा मंडळाच्या वतीने वृक्ष लागवडीची सुरूवात करण्यात आली यासाठी पाण्याची उपलब्धता संजय भोसीकर यांनी स्वतःच्या खर्चातुन करून दिली यावेळी निसर्ग सेवा मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
यावेळी डॉ नंदिकेश्वर महाराज यांनी केलेल्या कामाचे कौतुक करुन सर्वाना आशिर्वाद दिले यावेळी सौ वर्षाताई, सौ राजश्रीताई व मनोर मनोहर पाटील आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सौ.वर्षाताई यांना जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच सौ राजश्रीताई व मनोहर पाटील भोसीकर यांचे वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पाटील डोम यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक पाटील भोसीकर यांनी केले या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.