आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्याने गोगदरी साठवण तलावाचे 2 कोटी 27 लक्ष रुपये अनुदानाचे शेतकऱ्यांना धनादेश वाटप

कंधार

गोगदरी ता. कंधार येथील सन 2014 पासून प्रलंबित असलेले साठवण तलावांचे शेतकऱ्यांचे 2 कोटी 27 लक्ष रुपयाचे अनुदान लोहा- कंधार मतदारसंघाचे, आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाले असून गोगदरी येथील शेतकऱ्यांना आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते साठवण तलावाच्या अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले .

यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक उपस्थित होते .गोगदरी येथील शेतकऱ्यांची साठवण तलावासाठी शेतजमिनी संपादित केल्या होत्या पण संपादित केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मावेजा अद्यापपर्यंत मिळाला नव्हता, लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी गोगदरी येथील साठवण तलावाच्या शेतकऱ्यांना मावेजा मिळावा म्हणून मंत्रालय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता,

आमदार शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून गोगदरी साठवण तलावासाठी 2 कोटी 27 लक्ष रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी ही रक्कम मिळवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी विशेष लक्ष दिल्यानेच गोगदरी साठवण तलावाचे अनुदान मिळाल्याचे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले,

यावेळी गावकऱ्यांच्या वतीने व सर्व स्तरातून आमदार शिंदे यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे, यावेळी शाम सावळे, संतोष कल्याणकर ,श्रीपत पाटील, कल्याणकर, बळीराम जाधव, माधव कल्याणकर सह अधिकारी, गावकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *