श्री शिवाजी विद्यालय बारुळ या ज्ञानालयात सामान्य ज्ञान परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण!

कंधार ; प्रतिनिधी

सध्या वर्तमानाच्या अधुनिक युगात स्पर्धेतून गुणवंत होण्यासाठी चणुकांही चढाओढ लागली आहे.प्रत्येक विद्यार्थी स्पर्धात्मक परिक्षेला सामोरे जावून प्रशासकीय सेवेची दारे ठोठावण्यात एम.पी,एस.सी अन् यु.पी.  एस.सी सहित सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना दिसते आहे.यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुर्वतयारी म्हणून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता. कंधार चे संस्थापक व संचालक डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब (ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व मा.आमदार)यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रमशील आदर्श प्रा.टी.एस.चौथरे यांनी ज्यूनिअर काॅलेज बारुळ येथील ज्ञान प्रबोधनी अर्थशास्त्र विभागा तर्फे  सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमा प्रसंगी श्री शिवाजी मो.ए.सोसायटी कंधारचे सचिव, माजी आमदार, मन्याड खोर्‍यातील कला महर्षी मा.भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब , उपाध्यक्ष माधवराव पेटकर साहेब(माजी सरपंच क्रांतिभुवन बहाद्दरपुरा),श्री शिवाजी हायस्कूल कंधार चे ग्रंथापाल,उत्कृष्ट चित्रकार, लेखक,कल्पकतेचे गुरु श्री एमेकर सर आणि बारुळ पंचक्रोशीत समाजकार्यात अग्रेसर नामदेव महाराज मठ संस्थान बारूळचे ह.भ.प.वंदनीय गुरुवर्य श्री नामदेव महाराज यांची उपस्थिती ठळक होती.कार्यक्रमाची सुरुवात मातृभुमीस राष्ट्रीय गीत वंदेमातरम संस्थेच्या प्रथेनुसार गायल्या नंतर गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर आणि ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे सन्मानिय अध्यक्ष संस्थेचे सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांचे गुलाब पुष्प हार अन् लेखनीचा हार घालुन मुख्याध्यापक अनिल वट्टमवार सर यांच्या समर्थ हस्ते विद्यालय व अर्थशास्त्र ज्ञान प्रबोधनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.गुराखीपिठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आलेले फलक लेखन केलेल्या फलकाचे उद्घाटन मन्याड खोर्‍यातील कलावंत भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या हस्ते झाले.

प्रस्ताविक मुख्याध्यापक वट्टमवार सर यांनी करुन सामान्य ज्ञान परिक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात मन्याड थडीचे कलामहर्षि, केशवसखा भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांचे समर्थ हस्ते श्री शिवाजी विद्यालय बारुळचे आदर्श कलाध्यापक,उत्कृष्ट फलक लेखनकार पांडुरंग गोविंदराव मेहकरकर सरांनी काढलेले विविध जयंत्या व मयंत्याचे अन् दिन विशेषांचे फलकरेखाटन करत असतात.तसेच  कलाध्यापक नसतांना उत्कृष्ट पेन्सिल स्केच सहज काढणारे सेमी विभागाचे आदर्श शिक्षक प्रदीप सूर्यवंशी सर यांचा अन् विद्यालयात वृक्षवल्लींचे जतन करणारे व त्यांना वाढविणारे वृक्षमित्र,हिंदी विषयाचे आदर्श शिक्षक भिष्माचार्य मेहेत्रे सर व सेविका श्रीमती शोभाबाई जेजेराव येलूरे यांचा मुलगा बलराज येलूरे यांचा आणि प्रा.डाॅ.राहूल वाघमारे सर यांनी रांगोळीच्या उत्कृष्ट उपक्रमातून केलेल्या कार्याचा सत्कार करुन गौरव केले.संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर यांनी आपल्या भाषणात शाळेच्या विविध उपक्रमाचा उल्लेख करून सर्व स्टाफच्या कार्यावर स्तूती सुमनांचा वर्षाव केला.

अध्यक्षीय समारोप करतांना सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेबांनी मुलींच्या उपस्थित संख्येचे तोंडभरून कौतुक केले.अनेकांची शतकपुर्ती मरणोत्तर होते.पण संस्थेचे संस्थापक डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या हयातीत हा शतकमहोत्सवी वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे.असे आपल्या भाषणात विचार मांडले.फलक लेखनकाराचे व पेन्सिल स्केच कलावंताचे तोंडभरुन कौतुक केले. श्री शिवाजी मोफत शिक्षण संस्था ता कंधार चे संस्थापक व संचालक डॉ केशवराव धोंडगे साहेब(जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार)यांच्या शतकोतर वाढदिवसाच्या निमित्ताने “अर्थशास्त्र व ज्ञान प्रबोधिनी”आणि सांस्कृतिक आणि क्रीड़ा विभाग च्या मार्फत दि 27/01/22 रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात यशस्वी झालेले गुणवंत खलील प्रमाणे आहेत.

1)शिंदे सांईप्रसाद संतोष

    समानचिन्ह, भारताचे संविधान आणि 2500 रु रोख.

2)कु शिंदे ऋतुजा नारायण

 सन्मानचिन्ह,विद्यर्थिनो जागृत व्हा! ले डॉ बी आर आम्बेडकरआणि2000रु रोख

3)जगताप संदेश केशव

 सन्मान चिन्ह,शिवाजी कोन होता? ले गोविंद पानसरे आणि 1500 रु रोख

आणि उत्तेजनार्थ:-

1)गायकवाड़ संदीप उद्धवराव

  2)गाढ़े दत्तराम व्यंकटी

3)वाघमारे शिवपुराण सुभाष

4)कु नाईक श्रद्धा संजयराव

 हे विद्यर्थि यशस्वी झाले आहेत.

यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या समर्थ हस्ते करण्यात 

 आले.या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मु.अ.श्री वट्टमवार ए.बी. उप.मु.अ. श्री बसवंते बी.एम. पर्यवेक्षक श्री कुंडगीर पी.आर. ज्यु.काँ.चे पर्यवेक्षक प्रा. संजय गरुडकर सर,शिवशंकर पत पेढीचे चेअरमन,ज्येष्ठ शिक्षक तेलंग जी.जी.,रा.ना.ठाकुर,एम.सी.शिंदे, इरलवाड के.जी,अनिल जोगदंड, व्यंकट पाटील,श्रीधर,लुंगारे,अरुण शिखरे, जायभाये सर,आदींनी परिश्रम घेतले.

. या कार्यक्रमाची छायाचित्रे अजित बंडेवार,गोरे जे.पी. यांनी केले. विद्यार्थ्यांना शिस्तित बसवण्याचे काम श्री गुध्दे एन.टी.,जोगदंड ए.एस.,आणि इतर शिक्षकांनी केले.शेवटी आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री सोनटक्के सर यांनी मानले.

  राष्ट्रागीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *