फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
ता. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले त्यात सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , कामगार , बचत गट , वैद्यकीय, कला, क्रीडा, प्रबोधन, व्यावसायिक अशा एकूण १० क्षेत्रात संघर्षमय जीवन जगत आपल्या खडतर जीवन जगणाऱ्या महिलांना नारीरत्न जीवन गौरव सन्मापुरस्काराने दि ८मार्च रोजी कंधार येथे सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रजापिता ब्रम्ह कुमारी विश्वविद्यालय कंधार चे ज्योती बहेनजी,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा विद्याताई फड यांची उपस्थिती होती यावेळी प्रा विद्याताई फड म्हणाल्या की "जीवन एक संघर्ष हैं" म्हणुन जीवन जगत आपल्या कुटुंबास सन्मानाने जीवन जगण्यास आधार देणाऱ्या नारीशक्तीचा गौरव करण्याचा मानस त्यांनी ठेवला त्यावरून हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे ,असे त्या म्हणाल्या तर आत्मबल हाच उत्तम जीवनाचा मार्ग तो जगण्या साठी विचारांची प्रगल्भता आवश्यक असते व ती महिलांन मध्ये जन्मजात असते म्हणून तीस जगात जननी म्हटले जाते असे या वेळी अध्यक्षीय समारोपात ज्योती बहेनजी यांनी केले .यावेळी विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा नारीरत्न जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विरपत्नी पुरस्कार -- कोमल हणमंतराव काळे उस्मानगर , शीतल संभाजी कदम ,जानापुरी , अर्चना बालाजी डुबुकवाड ,बाचोटी, जीवनगौरव नारीरत्न पुरस्कार गोकर्णा माधवराव विभूते ( बचतगट ) , पार्वतीबाई दिगंबरराव वाघमारे ( वैद्यकीय ) , वंदना रामराव होणराव ( सामाजिक व संघर्षमय जीवन ) रेखा गोरडवार ( पत्रकार ) , रसीदाबी शेख मोईन ( स्वच्छतादूत ) , वसीमा महेबूब शेख (शैक्षणिक) संचला माधवराव गुंडे ( आरोग्यसेवा ) लक्ष्मी मुंगीलवार,(कला)जनाबाई जिलेवाड(प्रभोधन) अशा विविध क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सपना यन्नावार, सीमा बनसोडे,कीर्ती ठाकूर, रोहिणी चिवळे, ज्योती कल्याणकर,सिंधूताई चिवळे,उपस्थिती होती ,या वेळी सूत्रसंचालन दत्तात्रय येमेकर यांनी केले तर प्रास्ताविक सपना यन्नावार यांनी केले या वेळी आयोजक रविकांत चितळे निवडसमिती चे योग शिक्षक निळकंठ मोरे , सुंदर अक्षर शाळेचे दत्तात्रय एमेकर , अड गंगाप्रसाद यनावर , शंतनू कैलासे,निलेश गौर,प्रवीण बनसोडे,अड सागर डोंगरजकर,शुभम संगनवार,सुरेश कल्याणकर,राम बामनवाड यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले