जागतिक महिला दिनानिमित्त प्रियदर्शनी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या वतीने कंधार व परिसरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार व सन्मान आयोजित केला जातो.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालक प्राध्यापक श्रीमती चित्राताई लुंगारे, प्रमुख पाहुण्या व सत्कारमूर्ति महिला कांग्रेस च्या तालुका अध्यक्षा सौ. आशाताई गायकवाड़,सौ. शिवकांताताई मंगनाळे, सौ.विजया मंगनाळे, सरपंच सौ गोदावरीबाई गायकवाड, सौ कल्पना पेटकर प्राचार्य सौ राजश्री शिंदे डॉक्टर सौ. दिपाली तायडे,डॉक्टर सौ.वसुधा आंबेकर, डॉक्टर सौ.मीनाक्षी सादलापुरे,डॉक्टर सौ.तक्षशिला पवार, डॉक्टर सौ नम्रता फुलवळे, सौ. मीरा शिरसागर,सौ. श्यामा पाटील,श्रीमती प्रतिभा खैरे,सौ.मनीषा कुरुडे,कंधार पोलीस दलात काम करणाऱ्या महिला सौ.राधा पदमपल्ली, श्रीदेवी मारवाडे, शारदा कदम, सुमन फुके, ज्योती कदम, जया गायकवाड, निर्मला वाघमारे, सौ.नंदाबाई गाढवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता माँ जिजाऊ साहेब व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे श्रीमती चित्राताई लुंगारे,यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या वतीने उपस्थित मान्यवर महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सौ.राजश्री शिंदे यांनी केले यावेळी सौ.आशा गायकवाड,सौ.कल्पना पेठकर,डॉ. सादलापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्यामा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा खैरे यांनी केले यावेळी विद्यालयातील मुली व शहरातील महिलांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.