शहीद वीरांच्या पत्नीस पुरस्कार देवून केला जागतिक महिला दिन साजरा!
गऊळ ; प्रतिनिधी शंकर तेलंग
आज ८ मार्च २०२२ रोजी कंधार शहरातील नगरेश्वरांच्या पवित्र स्थळी जागतिक महिला दिनी भारतीय माजी सैनिक,मा.रविकांत चिवळे मानसपुरीकर यांच्या वाढदिवसा निमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.त्या भारतीय शहीवीरांच्या वीर पत्नी १) शीतल संभाजीराव कदम(जानापुरी),कोमल हनमंतराव काळे (उस्माननगर),अर्चना बालाजीराव डुबुकवाड(बाचोटी)या वीर पत्नी सहीत दहा कर्तबगार मन्याड खोर्यातील नारी शक्तींना पुरस्कार मान्यवर कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या ज्योती बहेनजी मॅडम तर प्रमुख व्याख्याती म्हणून श्री शिवाजी हायस्कूल कंधारच्या प्राध्यापिका सौ.विद्याताई फड मॅडम नारीशक्तीपिठावर उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी स्वच्छता दुत (भंगीचे काम करणारी माऊली) राशीदबी शे.मोईन(सुलतानपुरा) यांची नारीशक्तीपिठावरील ठळक उपस्थिती अन् वीर पत्नी शीतल संभाजीराव कदम आणि कोमल हनमंतराव काळे यांच्या उपस्थितीने चार चांद लावले. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेला वंदन करतांना वंदेमातरम राष्ट्रीय गीत गायन करुन, गानकोकिळा लता दीदी मंगेशकर,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ,मुखेड येथील गावाकडे सुट्टीवर आलेले सेवारत सैनिक राजू विठ्ठलराव साखरे यांचे सहित भारत मातेच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या शहिद आणि हुतात्म्यांना विनम्रभावे आदरांजली अर्पण करण्यात आली.स्वागत नृत्य कु.सृष्टी मुलुकपाडे या चिमुकलीने नेत्रदीपक करुन उपस्थितांचे मन मोहीत केले.अध्यक्षा व व्याख्याती आणि प्रमुख अतिथींचे स्वागत सौ.रोहिणी चिवळे,सौ.स्वप्ना यन्नावार, सौ.सीमा बनसोडे,सौ. ज्योती कल्याणकर या भगीनींच्या समर्थ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.स्वप्ना गंगाप्रसाद यन्नावार या भगीनींने केली.
कार्यक्रमाची प्रमुख व्याख्याती सौ.विद्याताई फड मॅडम यांनी नारीशक्तीचा आपल्या आभ्यासपुर्ण भाषणात मांडतांना कर्तबगार माऊलींचा नामोल्लेख करुन गौरव केली.स्वच्छता दुत माऊलीची पुरस्कार देवून गौरव मला वाटते अख्या महाराष्ट्रात एकमेव कंधार नगरीत पुरस्कार दिली अन् नारीशक्तीपिठावर सन्मानपूर्वक विराजमान करुन मन्याड खोर्याने इतिहास घडविला असे गौरवोद्गार काढले. पुरस्कार विजेत्या मायमाऊल्या खालील प्रमाणे.
वीर पत्नी पुरस्कार
१)शीतल संभाजीराव कदम,जानापुरी २) कोमल हनमंतराव काळे,उस्माननगर ३) अर्चना बालाजीराव डुबुकवाड, बाचोटी यांना मान्यवरांच्या समर्थ हस्ते प्रदान करण्यात करण्यात आला.
कर्तबगार नारीशक्ती पुरस्कार
राशीदबी शे.मोईन(स्वच्छतादुत) सुलतानपुरा २)सौ.पार्वतीबाई दिगंबरराव वाघमारे,(वैद्यकीय सेवा(कंधार ३)सौ.वसीमा शे.मेहबूब, (कर्तबगार आई)जोशी सांगवी ४)सौ.रेखाताई गोरडवार,(पत्रकार) गऊळ ५)श्रीमती वंदनाताई रामराव मंगनाळे (कर्तबगार आई)६)संचला माधवराव गुंठे,(आरोग्यसेवा) वारखरड,
७) सौ.गोकर्णा माधवराव विभुते (बचतगट)मानसपुरी, ८) संगीता माधवराव मुंडे (कर्तबगार आई)पाताळगंगा, ९)सौ.लक्ष्मीबाई नारायणराव मुंगीलवार,कंधार, १०) सौ.जनाई जिलेवार (प्रबोधन) कंधार.
या सर्व नारीशक्तींचा पुरस्कार देवून गौरवान्वित जागतिक महिला दिनी करण्यात आले.शेवटी माजी सैनिक नाना चिवळे यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्य अभिष्टचिंतन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.निरीक्षक म्हणून दत्तात्रय एमेकर, नीळकंठ मोरे,गंगाप्रसाद यन्नावार, शंतनु कैलासे यांनी केले,सुत्रसंचलन व आभार दत्तात्रय एमेकर यांनी मानले.चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.माजी सैनिक नाना चिवळे मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.