कंधार ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

आज दिनांक 08/03/2022 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर सर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय कंधार येथे जागतिक महिला दिनाची सुरुवात डॉ. लोणीकर सर यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर
मातोश्री जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आले.


तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस. आर. लोणीकर सर यांनी सर्व महिला वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे
डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे साहेब
(MD Medicine)
यांनी हस्ते सर्व महिला वैद्यकीय अधिकारी व पुरुष वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. NCD अंतर्गत आरोग्य तपासणी ,ECG तपासणी,
थायरॉईड तपासणी,बिपी,मधुमेह तपासणी इत्यादी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनी डॉ.एस आर. लोणीकर सर म्हणाले की स्त्रीना अंगणवाड्यांच्या माध्यमातून परसबाग – राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत परसबाग ही संकल्पना राबवण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या परिसरात परसबागांचा उपक्रम घेण्यात येतो आहे. यामध्ये विविध पालेभाज्या आणि फळभाज्या यांची पिके घेतली जातात. पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येत असलेली परसबाग योजना आता कुटुंबांसाठी वरदान ठरते आहे, यामुळे अनेक कुटुंबांची दररोजची थाळी चौरस आहाराने सजते आहे. परसबाग या सुंदर संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं, ते अंगणवाडी सेविकांनी.

पोषण माह – कुपोषित आईच्या पोटी कुपोषित बालक जन्माला येणार, त्यामुळे सुदृढ बालके, सुदृढ कुटुंब, सुदृढ समाज आणि सुदृढ राष्ट्र घडवायचे असेल तर महिलांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक पोषणाकडे लहानपणापासून लक्ष देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र व महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून घोषित केला आहे.

अंगणवाड्यांमधून योग्य आहार गरोदर व स्तनदा माता, मुले यांना पुरविण्यात येत आहे. कोरोना काळातही यात खंड पडू दिला गेलेला नाही.

राज्य महिला आयोग – राज्यातील पीडित महिलांना आपल्या तक्रारी इत्यादी प्रकरणात जलद न्याय मिळणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. राज्यभरातील महिलांना आपल्या तक्रारी घेऊन मुंबईला येणे सोयीचे नाही, हे लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालयांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ही सर्व कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभागाची मदत घेऊन पीडितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोग काम करत आहे.

महिलांसाठीच्या विविध योजना – वंचित, पीडित महिलांच्या सहाय्यासाठी महिला आणि बालविकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या निवारा योजना, राज्य महिला गृहे, आधारगृहे, अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान, देवदासींना निर्वाहाकरीता आणि त्यांना व त्यांच्या मुलींना विवाहाकरिता अनुदान देण्याची ‘देवदासी कल्याण योजना’,महिला समुपदेशन केंद्र, अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र आदी योजना राबविण्यात येतात. खऱ्या वंचीत, पीडितांपर्यंत या योजनांच्या माध्यमातून मदत पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत.

महिलांचे मालमत्ताविषयक हक्क संरक्षित – कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मागील
दोन वर्षात कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या
मालमत्ताविषयक हक्कापासून वंचित ठेवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे या महिलांचे मालमत्ताविषयक व अन्य आर्थिक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने 24 फेब्रुवारी 1975 साली या महामंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्र शासनाने दि.20 जानेवारी 2003 नुसार महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय “शिखर संस्था” म्हंणून घोषित केले आहे. महिलांच्या क्षमता विकसित करणे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे व उद्योजकीय विकास घडवून आणणे, रोजगाराच्या संधी व बाजारपेठ यांची सांगड घालणे. महिलांचा शिक्षण, संपत्ती व सत्तेत सहभाग वाढविणे, स्थायी विकासासाठी स्वयंसहाय्यता बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ काम करते असे मनोगत केले .


ग्रामीण रुग्णालयाचे
डॉ.रविकिरण पोरे दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले सर,डॉ.संतोष पदमवार डॉ.श्रीकांत मोरे, डॉ. शाहीन बेगम ,डॉ. गजानन पवार,
डॉ.उजमा तबसुम,
डॉ. अरुणकुमार राठोड,
डॉ. नम्रता ढोणे,
डॉ. दत्तात्रय गुडमेवार ,
डॉ.निखहत फातेमा ,व कर्मचारी श्री.ज्ञानेश्वर बगाडे
(सहाय्यक अधीक्षक) ,
श्रीमती. पि. डी. वाघमारे (अधिपरिचारिका),
श्रीमती. शीतल कदम,
श्रीमती. राजश्री इनामदार ,
श्रीमती.अश्विनी जाभाडे,
श्रीमती. मनीषा वाघमारे, श्रीमती.आऊबाई भुरके, (अधिपरिचारिका), श्रीमती.सुनिता वाघमारे,
श्रीमती. प्रियंका गलांडे ,
श्रीमती. सुरेखा मैलारे,
श्रीमती.ज्योती तेलंगे,
श्रीमती.अनिता तेलंगे (परिचारिका)
औषध निर्माण अधिकारी श्रीमती. वंदना राठोड ,श्री.दिलीप कांबळे, श्री.शंकर चिवडे ,श्री.लक्ष्मण घोरपडे ,श्री.यशवंत पदरे, श्री.सोपान चव्हाण, श्री.आशिष भोळे

,श्री.अरविंद वाठोरे,
श्री.नरसिंग झोटींगे
(आरोग्य कर्मचारी)
श्री. प्रशांत कुमठेकर
श्री. विष्णुकुमार केंद्रे
श्री .कोंडाआप्पा स्वामी ,
श्री.सचिन ठाकूर
(प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
श्री विठ्ठल धोंडगे (एक्स-रे टेक्निशियन)
श्री.राजेंद्र वाघमारे,( समुपदेशक),
श्री. प्रदीप पांचाळ(ICTC), सरवर शेख, श्री. संतोष आढाव.
चालक श्री.अशोक दुरपडे,
श्री.सुनील सोनकांबळे,
श्री.भीमाप्पा हमप्पले, युसुफ सय्यद, श्री.दिपक फुलवळे,
श्री. श्रीहरी कागणे,
श्री. संभाजी मोकले
याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *