कंधार
नाम फाउंडेशन नांदेड च्या वतीने कंधार तालुक्यतील १३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आज रविवार दि 13 मार्च रोजी बचत भवन कंधार येथे प्रत्येक लाभार्थी कुटूबियांना सुमारे 25 हजाराची मदत करण्यात आली.
कंधार तालुक्यातील 13 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना व वारसांना सदर आर्थिक मदत करण्यात आली .

यावेळी नाम फाउंडेशन चे केशव घोणस पाटील, नायब तहसीलदार राजेश पाठक, गटविकास अधिकारी मांजरमकर, कंधार चे पोलीस निरीक्षक पडवळ, पंचायत समितीचे सदस्य सत्यनारायण माणसपुरे, यांच्या उपस्थित आर्थिक मदतीचा धनादेश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
