हिमायतनगर –
अधिक माहिती सांगतांना ओमप्रसाद चव्हाण म्हणाला युक्रेन मध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी गेलेला मी नवीनच विद्यार्थी आहे, माझ्यासह तेजस गायकवाड, सौरभ रोकडे, संतोष जाधव, अजीत हराळे, हे ही युक्रेन मध्ये शिक्षण घेतात. अशातच येथे रशिया युक्रेन युध्द सुरू झाले.
युक्रेनमध्ये मी ज्या मेडीकल कॉलेजला आहे, ते गोकुळ मेडिकल युनिव्हर्सिटी रोमानिया बॉर्डर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही जेथे रहायचो तिथुन युद्ध पूर्व दिशेला सुरू होते, आम्ही पश्चिम दिशेला होतो, तेवढा त्रास आम्हाला जाणवला नाही, परंतु जे विद्यार्थी यूक्रेन, खारक्युम, जेप्रोफाईट मध्ये होते. त्यांना खूप त्रास झाला.
कॉलेजच्या व्यवस्थापनाने तुकड्या तयार केल्या, पहिल्या दोन तुकड्या चांगल्या आल्या, तिसरी तुकडी रोमानिया युक्रेन बॉर्डरवर तीन दिवस अडकून पडली होती. उणे 16 अंश सेल्सिअस तापमानात त्यांना राहावे लागले, खाय, प्यायचे वांदे रात्रीला हल्ले व्हायचे, त्यामुळे त्यांना परेशानी व्हायची, मनात भीती होती, कधी काय होईल सांगता येत नव्हत.
कॉलेजची भारतीय विद्यार्थी संस्था आहे. त्या माध्यमातून संकटात सापडलेल्या तीन हजार विद्यार्थ्यां पर्यंत जेवण करून पोहोचण्यास मदत केली.
क्यु मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचे विमान बारा वाजता उड्डाण घेणार होते परंतु तेथे सकाळी पाच वाजताच बॉम्बस्फोट झाला होता, तिथे विद्यार्थ्यांना बंकरमध्ये राहव लागल. रेल्वेने प्रवास करावा तर युक्रेनच्या स्थानिक नागरिका व्यतिरिक्त भारतीयांना प्रवास करू देत नव्हते, वार चांगला नसतो यावर तोडगा निघाला पाहिजे, देशाच आर्थिक नुकसान तर होतेच, त्याचबरोबर आमच्या सारख्या होतकरू विद्यार्थ्याच्या अभ्यासावर शिक्षणावर परिणाम होतो, वार नको प्रेमाने जग जिंकता येते, हा वार थांबावा सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप वापस मायदेशी आनावे असे ही ओमप्रसाद चव्हाण म्हणाला.
कठीण काळात मायदेशी परतन्यास मदत केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, खासदार हेमंत पाटिल, तालुकाप्रमुख आशिष सकवान यांचे आभार मानले, त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.