नांदेड –
तळणी, उंचेगाव या गावांच्या परिसरात माझे बालपण गेले त्या भागाच्या , तालुक्याच्या विकासासाठी काहीतरी करण्याची तळमळ मनात अनेक वर्षांपासून दाटून होती . योगायोगाने कयाधू नदीवर पूल बांधकामाचा योग जुळून आला व या कामासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे विशेष आग्रह धरून पुलाच्या कामाला मंजुरी मिळवून घेतल्याची भावना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त करून याभागात घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला .
यंदाच्या अर्थसंकल्पात हिंगोली लोकसभा मतदारसंघ कोट्यधीश झाला आहे. संपूर्ण मतदारसंघासाठी १४२ कोटीच्या वर निधी मंजूर झाला असून यामध्ये रस्ते , पुल बांधकामासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर , किनवट, माहूर तालुक्यासाठी ३४ कोटी ६० लक्ष रुपयाच्या निधीची तरतूद केली आहे.
यातील प्रमुख सर्वसामान्य जनतेच्या तात्काळ कामी येणारे काम म्हणून हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील कयाधू नदीवरील पूल आहे. तो तळणी – साप्ती – कोहळी – शिरड – पेवा – करोडी – उंचेगाव – भानेगाव – हदगाव रस्ता राज्य मार्ग ४१६ कि. मी. मध्ये २५/६०० या साखळी रस्त्यांतर्गत येतो कयाधु नदीवर मोठ्या पुलाचे जोडरस्त्यासह व भूसंपादन करून बांधकाम करण्यासाठी २५ कोटीचा भरीव निधी मंजूर केला आहे .
मतदारसंघातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीवरील वाटेगावच्या पुलासाठी खासदार हेमंत पाटील यांनी यापूर्वीच निधी मंजूर करून घेतला आहे तर हदगाव मधील वायपना व हिमायतनगर मधील पळसपूर येथील ग्रामीण रस्त्यासाठी १६ कोटींचा निधी मंजूर करून नुकतेच त्या कामाचा शुभारंभ केला आहे.
उंचेगाव येथे कयाधू नदीवर होणाऱ्या या पुलामुळे जुन्या नागपूर महामार्गाला झळाळी मिळणार असून नांदेड , हिंगोली जिल्ह्यातील प्रवाश्यांना थेट विदर्भात जाता येणार आहे त्याकरिता पूर्वी ५० किमीच्या वर फेरा घेऊन पुसद नागपूर जावे लागत होते ते या पुलामुळे सोयीस्कर होणार आहे .
खासदार हेमंत पाटील यांचा पुढाकार, सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे मतदारसंघात आणखीही महत्वपूर्ण विकास कामे तेजीने सुरु आहेत लवकरच त्याचे मूर्त रूप मतदारसंघातील जनतेला दिसेल यात दुमत नाही.