स
कंधार
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा नवामोंढा संभाजीनगर कंधार या नूतन इमारतीचा प्रवेश व सत्यनारायण महापूजा कार्यक्रम सोहळा दिनांक २५ मार्च २०२२ रोजी शुक्रवार संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी . एन . केंद्रे साहेब , कोषाध्यक्षा सौ. मुक्ताबाई दौलतराव केंद्रे यांच्या शुभहस्ते व तसेच भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ . प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमास संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी नगरसेवक चेतन भाऊ दौलतराव केंद्रे , अनुसया चेतन केंद्रे माजी नगराध्यक्षा , महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जे . जी . केंद्रे साहेब , महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी . जी . वाघमारे , भाजपा शहर सरचिटणीस मधुकर पा. डांगे ,भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, पानशेवडी चे माजी सरपंच रमेश मोरे , नवघरवाडी चे माजी सरपंच कैलास पाटील नवघरे , भाजप शहर चिटणीस महेश मोरे , नगरसेवक प्रतिनिधी सागर कदम , अविनाश गीते , अविनाश कहाळेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी . एन . केंद्रे साहेब यांनी करताना आपली भूमिका स्पष्ट केली . नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा कार्यकर्ता म्हणून नेहमीच त्यांची मला साथ लाभल्याचे स्पष्ट करत गतवर्षी भाजपाचा घरगुती कार्यकर्ता मेळावा घेतला होता असे सांगून या वर्षी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आशीर्वादाने सदरील वास्तूचे निर्माण झाले असून या महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीतून असंख्य होतकरू व गुणवान विद्यार्थी घडतील असा विश्वास व्यक्त केला .

या कार्यक्रमात उपस्थित भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिता ताई देवरे चिखलीकर यांनी सदरील नूतन इमारतीचा प्रवेश सोहळा व सत्यनारायण महापूजा निमित्त उपस्थित राहून महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या वास्तूचे भरभरून कौतुक केले आदरणीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेहमी सोबत असणारे दौलतराव केंद्रे काका यांना शिक्षणाची जाण असल्यामुळे सदरील वास्तू भव्य स्वरूपात निर्माण झाल्याचे सांगून भरभरून शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे आभार संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव श्री चेतन भाऊ दौलतराव केंद्रे यांनी केले , तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले प्राथमिक शाळेचे शिक्षिका सौ उषा कागणे , शिक्षक आनंदा आगलावे , राजू केंद्रे , किरण गिते , लक्ष्मण मुंडे , ई . बी केंद्रे , चंद्रकला माणिक तेलंग आदींनी परिश्रम घेतले.


