शेती सोबत दूध व्यवसायातून अनेक संकटावर मात करता येते – डॉ. अनिल भिकाने

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

मराठवाडा व विदर्भ पश्चीम महाराष्ट्राच्या तुलनेत दूध उत्पादनात खूप मागे आहे. म्हणून महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतिने विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भातील ११ जिल्ह्यात दुध व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनी फक्त शेती वरती विसंबून न राहाता शेती बरोबर दूध व्यवसाया कडे वळल्यास हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ओल्या व कोरड्या दुष्काळा सारख्या समस्येवर आपण यशस्वी मात करू शकतो शेतकरी कर्जमुक्त होऊन आत्मनिर्भर होवू शकतो असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चे संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांनी केले .

ते पशुसंवर्धन खाते, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी व मदर डेअरी यांचे संयुक्त विद्यमाने बाचोटी ता कंधार येथे आयोजित वंध्यत्व निवारण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प सदस्य ॲड विजय धोंडगे पाटील होते तर व्यासपिठावर सहाय्यक आयुक्त  डॉ रवि सुरेवाड, पशुप्रजनन तज्ञ डॉ अभिनव सावळे , तंटामुक्ती अध्यक्ष श्री उमाजी पाटील , श्री शिवदास गोधने ,  उपसरपंच श्री नितिन वरपडे ,मदर डेअरीचे श्री महेश पाटील , डॉ मोगल इरफान  आदी मान्यवर उपस्थित होते.

   डॉ भिकाने पूढे म्हणाले येत्या वर्षभरात वंध्यत्व निवारण मोहीम ही प्रभावी राबवली जाणार असून त्यात ३०० हून अधिक शिबीरांचे आयोजन केले जाणार असून किमान १५-२० हजार वध्यंत्व ग्रस्त जनावरावर उपचार केले जाणार आहेत तसेच शिबीरातून पशुपालका मध्ये जनावरातील प्रजोत्पादनक्षमता वाढविण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे . आपली कालवड लवकर वयात आली पाहिजे  व दोन वितातील अंतर एक वर्षावर आले पाहिजे जेणेकरून प्रत्येक गाई पासून तिच्या आयुष्यात जास्त वासरे मिळतील व दुध उत्पादनात भरीव वाढ होईल .

या प्रसंगी लाल कंधारी गोपालक विठ्ठल पांडुर्णे यांचा डॉ भिकाने यानी सत्कार केला शिबीरात ५६ जनावरांना वधयंत्ववरती उपचार करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार धिकारी डॉ. शामराव खुने , डॉ. उत्तम बोधमवाड , डॉ शुभांगी व्यवहारे, डॉ. श्रीनिवास झीकलोड , डॉ.दिनेश रामपुरे डॉ. शिवकुमार तमलूरकर , डॉ अजय शिवणकर , डॉ रवि तेप्पावार , डॉ. मंगेश टेकाळे ,डॉ. अरविंद दगडे श्री सुभाष पवार , पांडूरंग मुंडकर , पी एम धनगर यानी अथक परिश्रम घेतले .

यावेळी राहूल कांबळे मुखेडकर यांचेसह गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *