डॉ.आंबेडकर पुतळा येथे ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने दैनिक सत्यप्रभाच्या डीटीपी ऑपरेटर कु. रेखा गायकवाड यांचे निधन


नांदेड : येथील दै. सत्यप्रभा मधील डीटीपी ऑपरेटर कु. रेखा गायकवाड यांचे आज दि.14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर जयंतीदिनी सकाळी दहाच्या सुमारास डॉ
.आंबेडकर पुतळा येथे ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.


मृत्यूसमयी त्या ४२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात भाऊ , भावजय, एक भाची असा परिवार आहे.
कु. रेखा गायकवाड मनमिळाऊ व कर्त्तव्यनिष्ठ म्हणून परिचित होत्या. कु. रेखा गायकवाड ह्या आज दि.14 एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी नांदेड रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाची कु.त्रिविशा व शेजारी शाळकरी मुलगा अभिजित नरवाडे या दोघांना सोबत घेऊन गेल्या होत्या.


त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्या पुतळ्यासमोरील रस्त्यावर आल्या.भाची कु. त्रिविशा यांना त्यांनी कडेवर घेतले आणि अभिजित नरवाडे यास स्वःताचा मोबाईल देऊन फोटो काढण्यास सांगीतले. अभिजित नरवाडे यांनी त्यांचा पुतळा परिसरासह फोटो काढला. फोटो काढल्यानंतर काही क्षणातच अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या.


लोकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना बाजुला घेऊन पाणी पाजले. त्यांना उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.


कु. रेखा गायकवाड यांच्या पार्थिव देहावर आज दि.14 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कु. रेखा गायकवाड यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


विशेष म्हणजे कु. रेखा गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शूभेच्छा अशी शूभेच्छेची पोस्ट फेसबुक वर आज सकाळी साडे नऊ वाजता केली होती.
स्मृतीशेष कु. रेखा गायकवाड यांना मराठी पत्रकार परिषद व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *