आपल्या भारत देशात फळांचा राजा आंबा बहरतो.माघ मासारंभी आंब्याला मोहर येवून आंबा फळांची चाहूल लागते.मोहराच्या सुगंधाने आसमंत दरवळून निघतो.पण ढगाळ धुकं असलेले वातावरण मोहरास घातक ठरते.तो तोर आर्धा-आधिक गळून पडतो.कांही निसर्गाच्या अवकृपेने वादळ, गारपीट, ढगाळ वातावरणाने हाता तोंडास आलेला फळांचा राजा आंबा वसुंधरेशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत गळून पडतो.पण आंब्याच्या झाडाला यंदा फळांचा राजा लगडला आहे.हिरवीगार कैरी पाहताच तोंडाला पाणी सुटते.राना-वनात झाडाला सध्या कैरी स्वरुपात आहे.त्याची वाढ होताच, त्याचे पाडात रुपांतर होते.मग आंबा वृक्षावरुन उतरला जातो.मग त्यांचा माच पाचटात लावून पिकवत रसाळीस व खाण्यासाठी सज्ज करतो.यंदा महागाई वाढल्याने तो चढ्या भावाने विकतो की काय? असा प्रश्न पडतो आहे.
कोकणचा राजा हापुस बाजारात आला आहेच.पण आंब्याची गावरान जात नामशेष होतांना, कलम केलेली अनेकानेक आंब्याचे वाणं बाजारात आल्याने आंबा शौकीनांची चांदी झाली.मृग नक्षत्रात रायत्याच्या आंब्याची लगबग सुरु होते.पुर्वी आंब्याचे रायते राबविण्याची पध्दत आता कमी झाली वाटते.कारण बाजारात अनेक प्रकारच्या रेडीमेड पाऊच व बरण्या उपलब्ध आहेत.
यावर मला वाटले नुसतेच कैरी व तिखट,मीठ याचे चित्र न टाकता.शब्दबिंबात या कैरीचा आंबटपणा दाखवताच नारीशक्ती सहित अनेकांच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटणार यात कांही शंकाच नाही.आजचे गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांचे शब्दबिंब हे आजचे सदर आंबा फळांना समर्पित.
दत्तात्रय एमेकर ,
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार