अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) उदगीर येथे नुकतेच पार पडलेल्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रीताच्या कविसंमेलनात येथील नवोदित कवी विजय पवार आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र, आयोजित ….१६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, महात्मा बसवण्णा वचन साहित्य नगरी, उदगीर, जिल्हा लातूर येथे दि २३ – २४ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि २४ एप्रिल २२ रोजी सायंकाळी शहिद भगतसिंग काव्यपीठावर निमंत्रीतांचे कविसंमेलन भाग दोन पार पडले. यावेळी अध्यक्षपदी डॉ प्रतिभा अहिरे, औरंगाबाद या होत्या. सुत्रसंचालन कवी अरूण घोडेराव, नाशिक आणि डॉ व्यंकट सुर्यवंशी यांनी केले. तर कवी माधवराव लांडगे आणि डॉ सुशिलप्रकाश चिमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवोदित कवी विजय पवार यांनी, माझ्या महाराष्ट्र देशा’ आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी ‘मला सोडून ‘ ही रचना सादर केली. यावेळी प्राचार्य तुकाराम हरगिले, पत्रकार कवयित्री सुरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद ; जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, कवी वैजनाथराव कांबळे,शेख खद्दूस आणि प्रविण राठोड, बीड ; यांची उपस्थिती होती.


