न
भोकर मतदार संघासह जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न गतीने मार्गी लागावेत यासाठी ना. चव्हाणांनी यांनी सातत्यानेच प्रयत्न केले यातून अनेक कामे मार्गी लागली मात्र वाढते शहरीकरण यातून पुन्हा आणखी मूलभूत सुविधा यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत गत भाजपा सरकारच्या काळात विकासाच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केल्यानंतरही निधी देताना हात आखडता घेण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विकासाचा बॅकलॉग गतीने भरण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केला आहे. यातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास गेल्याने अर्धापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
अर्धापूर शहरातील अनेक भागात शोष खड्डे , सेफ्टी टॅंक , नाल्यात घाण टाकण्यात येते यासाठी अर्धापूर शहरात मलनिःसारण प्रकल्पाची गरज असल्याची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नगरपंचायतचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतची माहीती जाणून घेतली यानंतर त्यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत अर्धापूर शहराच्या मलनिःसारण प्रकल्पास मान्यता मिळाली असून यासाठी पहिल्या टप्पात ४२ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे तर दुसऱ्या आणखी १० कोटी रुपये मिळणार आहेत भूमिगत गटार योजनेमुळे आता शोष खड्डे , सेफ्टी टॅंकची गरज असणार नाही. सांडपाणी मलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी तसेच शहरात अंतर्गत मलनिःसारण वाहिन्यांचे काम केले जाणार असल्याने यातून दुर्गन्धी मुक्त अर्धापूर होणार आहे.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विकासाचा आणखी एक स्ट्रोकने अर्धापूर वासियांनी पालकमंत्र्यांचे आभार मानत विकासाचे प्रलंबित प्रश्न आता गतीने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला आहे.