पानशेवडी जिल्हा परीषद शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक ; शिक्षक,ग्रामस्थांचा सुंदर उपक्रम

कंधार

लेझीम पथक..झुल घातलेले बैल…बैलगाडी सजवलेली त्यात विद्यार्थी बसलेले..अशा पद्धतीने वाजत गाजत गावभर विद्यार्थ्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. पानशेवडी जिल्हा परीषद शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली त्यात शिक्षक,ग्रामस्थांचा सहभाग होता . .शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.एन.जी.यंबल(शहापुरे) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.गावातील नागरिक सुनील पाटील मोरे यांनी उस्फुर्तपणे स्वतः ची बैलगाडी सजवुन दिली.शाळापुर्व तयारी संबंधित गीत सादरीकरण उपक्रमशील शिक्षक श्री.आर.एन.केंद्रे व शिक्षिका सौ.अंजली उमाटे यांनी केले.

गाव करी ते राव न करी असं म्हंटले जातं ते पुन्हा एकदा खर ठरविले आहे ते पानशेवडी येथील ग्रामस्थांनी… या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.येथील उपक्रमशील शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळापुर्व तयारी करताना पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढली.लेझीम ची चाल…झुली घातलेले बैल..गाडीची .सजावट असा सगळा साज गावकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करणारा होता.पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.


शाळेतील मुख्याध्यापीका सौ.निलिमा यंबल(शहापुरे), शिक्षक देवराव ताटे,कैलास गरुडकर,प्रजाल शिंदे,दिगांबर मरशिवणे,रत्नाकर केंद्रे,दत्ता मुंडे व शिक्षिका सौ.अंजली उमाटे,सौ.मनिषा हिमटे यांनी वेगवेगळ्या सात टेबलवर विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्याचे काम केले व त्यांची नोंद कार्डवर घेण्यात आली.

या कार्यक्रमासाठी गट साधन केंद्र कंधार येथील विषयतज्ञ कनोजवार सर, बिराजदार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निलिमा यंबल यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरी पाटील मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील मोरे,खुशाल पाटील मोरे,भुजंग पाटील मोरे,पंडीतराव श्रीमंगले,दयानंद भालेराव,भैय्यासाहेब भालेराव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.मनिषा केशव बसवंते,उपाध्यक्ष अंबादास चव्हाण,सदस्य साहेबली शेख,समाधान भालेराव,सचिन गायकवाड व पत्रकार भुजंग सोनकांबळे,भिमराव सोनकांबळे,रमेश सोनकांबळे, संजय सोनकांबळे,सचिन भालेराव,भगवान भालेराव,गणपत सोनकांबळे,नागनाथ सोनकांबळे,लिंगोजी सोनकांबळे,केशव भालेराव,रजत शहापुरे व विद्यार्थी,पालक,गावातील नागरिक उपस्थित होते

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्ता मुंडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोविंद पवार व राम सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *