शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रभर द्विपंधरवाडा साजरा केला जातो.
हॉटेल विसावा मध्ये शिवा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते .यावेळी व्यासपीठावर समितीचे कार्याध्यक्ष वैजनाथ तोंनसुरे, कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबिडे ,जिल्हा संपर्कप्रमुख अनिल माळगे , शंकरराव पत्रे, दिगंबर मांजरमकर, वीरभद्र बसापुरे, नंदाताई पाटील, सत्यभामा येजगे, शुभम घोडके, नंदू आप्पा देवने ,सिद्धेश्वर स्वामी, आदींची उपस्थिती होती .

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून ची जिल्ह्यातील तमाम सहा लक्ष वीरशैव-लिंगायत बांधवांची मागणी पूर्ण झाली आहे. यावर्षी 22 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला समतेचा विचार अंगी बांधलेल्या प्रत्येक वीरशैव लिंगायत बांधवासाठी हा पुतळा प्रेरणास्त्रोत ठरणार आहे .पुतळा निर्मितीनंतर होणाऱ्या पहिल्या जयंतीला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही जयंती ऐतिहासिक करावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले .
या बैठकीत कार्याध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, विठ्ठल ताकबिडे शंकरांना पत्रे, पंडित कदम, आदींनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर मांजरमकर, सूत्रसंचालन शिवाजी कहाळेकर तर आभार जी.एस.मंगनाळे यांनी मानले. या बैठकीस विजय हिंगमिरे, बाबुराव कैलासे, संभाजी पावडे, शिवराज उमाटे ,श्रीकांत आरसेवार ,संजय पाटील चिटमुगरेकर, विलास कापसे ,संग्राम काडवदे,प्रकाश कांचनगिरे,बालाजी कोंडलवाडे, सदाशिव बोडके, राम भातांब्रे, अभिषेक पाटील ,प्रकाश जाळगे, बालाजीराव अल्लम खाने ,शिवा गिराम, नंदू येरगे,माधव भोकणे, शिवराज भोसीकर , शिवराज दरकासे, विठ्ठलराव मुखेडकर, संजय अकोले, माधव कंधारे, आदी उपस्थित होते.