सहज सुचलं म्हणून ;दोन प्रसंग, दोन संदेश


परवा म्हणजे दि २१ एप्रिल २२ रोजी मी गावी गेलो होतो म्हणजे फुलवळला. माईला, अण्णा आणि वहिनीला भेटलो. एक नियोजित तोरण आणि एक आकस्मित मरण सारून मी माझी कर्मभूमी धर्मापुरीला परतीच्या प्रवासाला निघालो. नेमकं उन उतरले होते. सकाळचे बातमीदार , माझा मित्र धोंडिबा बोरगावे यांनी आम्हा चुलत्या आणि पुतण्याला, संतोषला चहा पाजला होता. चार पाऊले संतोष सोबत चालावे आणि गावातील पाँइंटवर अँटो या वेळी लवकर भरणार नाहीत, तेंव्हा शेतून बाहेर गावातील अँँटोला पण हात दाखवता येतो, या विचाराने मी संतोष बरोबर शेती आलो.


शेती जवळ आलो. तो बरासीतून गराड्यात पडताच मी माझे नशीब आजमावत एका स्कुटीस्वारास हात दाखवला. कासराभर पुढे जाऊन तो थांबला. डाव्या हाताने त्यांनी डाव्या बाजूचे पायदान पसरविले. मी पण चटकन वाकलो आणि उजव्या बाजूची पाय ठेवण्याची जागा पसरवली. मला लिफ्ट मिळाली. मी स्कुटीवर बसलो.


काही वेळाने बोलताना समजले की तो स्कुटीस्वार साहेबराव राठोड, कुरूळेकर आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८३९०८१८७०७ असा आहे. फुलवळहून पुढे मुखेड जाणाऱ्या रोडवर केवळा तांडा आहे. तो तांडा त्यांची सासरवाडी. तेथील धन्नुमामा त्यांचे चुलत सासरे. चुलत सासुच्या अंत्यसंस्कारासाठी ते आले होते. परमेश्वर बबनराव सोमासे आणि सौ सुंदराबाई धनाजी राठोड काकू, दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली.


कंधारला उतरताच मी म्हटलं चला सर चहा घेऊया. पण ते गरबडीने लोहा अँटो पाँइंटवर गेले. मला पण त्याच पाँइंटवर जायचे होते. मी पाँइंटवर आल्यावर कळलं की त्यांना कुणापाशी तरी एक विसरलेली चावी लोह्यला पीन्टू जाधव, आर्मीस, मो नंबर ९४५६७७२९४९ द्यायची होती.
मी दोघांचेही मो नंबर आणि चावी घेतलो आणि लोह्यला निघालो. लोह्यला आलो ,चावी दिलो. थोडक्यात काय तर, जगात माणुसकी आणखी शिल्लक आहे. तीवरून जग चालू आहे. शिवाय माणुसंच माणसाच्या कामी पडतो.
तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि शुभसकाळ.


प्रा भगवान आमलापुरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *