कंधार
सौरभ सतिश लोखंडे वय 16 वर्षे रा.लॉ कॉलेज जवळ कंधार व ओम राजु काजळे वय 15 वर्षे रा.गवंडीपार कंधार हे दोन मित्र आज रविवार दि.२२. मे २०२२ रोजी दुपारी पोहण्यासाठी गेले होते.पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. .
याबाबत कंधार पोलीसातून अधिक मिळालेली माहिती अशी की सदरील दोन्ही मयत तरुणांस
पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने व पात्रात गाळ असल्याने पाण्यात बुडाले आहेत अशी माहिती त्यांचे सोबत असनारा मुलगा नामे बालाजी तुकाराम डांगे रा. लुंगार गल्ली कंधार याने घरच्यांना दिली .

परमेश्वर बालाजी चौधरी, कृष्णा बालाजी चौधरी , लक्ष्मण गुंडप्पा जोतकर यांचे मदतीने दोन्हीही मुलांचा मन्याड नदीचे पात्रात शोध घेउन दोघांचीही मयत बाँडी नदी पात्रातुन बाहेर काढली.

अर्जदार सतिष संभाजीराव लोखंडे रा.लॉकॉलेज जवळ कंधार यांच्या फिर्यादी वरून कंधार पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली . रात्री उशीरा पर्यत कंधार येथील ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले .


