आकाशवाणी नांदेड केंद्राचा ३१ वा वर्धापनदिन

  आकाशवाणी नांदेड केंद्राचा आज ३१  वा वर्धापनदिन. प्रथमतः वर्धापनदिनाच्या निमित्ताने नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन ! तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा ! 
     दुसरे म्हणजे, अहमदपूरचे प्रतिथयश कवी, आमचे मित्र, प्राचार्य तुकाराम हरगिले सर यांनी सर्वच महापुरुषांना एका कवितेत गुंफण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. प्राचार्य तुकाराम हरगिले सरांची  नक्कल करीत मी स्वतः आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही निवडक कार्यक्रमांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. ती रचना अशी आहे.'आकाशवाणी नांदेड.'
    कार्यक्रम, चिंतन
    घडवितो वैचारिक मंथन.
    कार्यक्रम परिसर
    जाग्रत करतो आंतबाहय चराचर.

दिनविशेष : सांगतो दिवसाचे महत्त्व,
व्यक्तीविशेष : सांगतो व्यक्तीचे महत्त्व.
रविवारीय ‘ आठवडी किर्तन’
पुर्ण करते आध्यात्मिक आवर्तन.
कार्यक्रम : किसानवाणी
जणू घुमतेय शिवारगाणी.
मराठी – हिंदी चित्रपट संगीत
करतेय आमचं जीवन रंगीत.
मुळातच एक तोंड ; दोन कान,
अधुनमधून ठेवतो ऐकन्याचा मान.
ऐकल्याशिवाय प्रादेशिक बातम्या
समाधान लागत नाही आत्म्या.


मुळात, आकाशवाणी नांदेड केंद्रावरुन सकाळी सकाळी प्रसारित होणारे बातम्यासारखं वार्तापत्र, ‘ नांदेड दर्शन ‘ हा कार्यक्रम काही तांत्रिक कारणाने बंद करण्यात आला.त्यातून नांदेड, परिसरात आणि जिल्हाभरात आज कोठे ? काय ? याची माहिती मिळत असे. पण तो बंद करण्यात आल्याने, ओघाने, नाही म्हटलं तरी,आकाशवाणीवरील अर्धेअधिक प्रेम कमी झाले. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यासाठी इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

असो…
आकाशवाणीशी निगडित ०४ गोष्टी आहेत. त्यातील एक आठवण मी गतवर्षी तुम्हा चोखंदळ रसिक श्रोत्यांना विस्तृतपणे सांगितली होती. शिवाय, गतवर्षी इतर अनेक रसिक श्रोत्यांसारखे, श्रोत्यांसोबत माझे मनोगत आकाशवाणीने ध्वणीमुद्रीत करून घेऊन ते प्रसारितही केलं होतं. त्याचा आनंद आहेच.


यापूर्वी एकदाच मी आकाशवाणीस ,’ फोन फर्माईश ‘ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्नपुर्वक फोन लावला होता. एकदा तो लागला. आणि दोन महिन्यांनी दिपवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शिवानंद शेंबाळे यांनी माझे अभिनंदन केले. तर त्याचसाठी विजय जाधव या मित्रांने चार महिन्यानंतर बार्शिला महादेवाच्या यात्रेत आठवणीने माझे अभिनंदन केले.
आकाशवाणी संदर्भातील आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणं मी अपरिहार्य समजतो. ती म्हणजे गतवर्षी लाँकडाउनमध्ये बऱ्याचवेळा आकाशवाणी ऐकणारा मी यंदा नाही म्हटलं तरी थोडंसं ती पासून दुरावलोच. कारण एकीकडे लाँकडाउन संपले आहे आणि दुसरीकडे बाहेरचे जग खुले झाले आहे. याचाच एक दर्श परिणाम म्हणजे इच्छा असुनही मी ” स्वातंत्र्याचा अम्रतमहोत्सव आकाशवाणी सोबत ” ,या कार्यक्रमाअंतर्गत एम जी एम महाविद्यालय आणि आकाशवाणीचा वर्तविभागातर्फे आयोजित केलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकलो नाही. हा खेद आणि खंत मनात आहेच. जर या कार्यक्रमात सहभागी होऊनमला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले असते तर आजच्या वर्धापनदिनाच्या आनंदाला आणखी ” चार चान्द ” लागले असते. पण असो…….$$$$$$पत्रकार कवयित्री सुरजकुमारी गोस्वामी यांची माफी मागून आणि त्यांच्या शब्दात थोडा बदल करून लिहावे वाटतं..


आकाशवाणी, आकाशवाणी,
तू आनंदाची गाणी,
तू रुपाची देखणी.
तूझ्या प्रसारणाने…
फुलो जीवनात आमच्या
आनंदाची सदाबहार चांदणी.
परत एकदा आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आकाशवाणीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ! तुम्हा सर्वांना लक्ष – लक्ष शुभेच्छा !


प्रा भगवान कि आमलापुरे.
फुलवळ ; ९६८९०३१३२८
द्वारे शं गु महाविद्यालय,
धर्मापुरी.ता परळी वै.
दि २७ मे २०२२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *