अहमदपुर ( प्रा भगवान आमलापुरे )
त्रैमासिक मुक्तमंथन २०२० पासून आंबेडकरी चळवळ गतीमान करण्यासाठी स्त्री संवादाची वैचारिक बैठक मुक्तपणे घडवून आणत आहे. ती अधिक व्यापक आणि गतीमान व्हावी यासाठी हा लेखक – वाचक मेळावा आयोजित केला आहे.
सकाळी १० : ०० वाजता सुरू होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ नारायण कांबळे असणार आहेत. कार्यक्रमाच्या उदघाटक प्रा डॉ सारिका केदार आहेत. मा सुनंदाताई बोदिले, संपादक त्रै मुक्तमंथन,अमरावती, मा प्रा डॉ चंद्रकांत सरदार, उपसंपादक, त्रै मुक्तमंथन यवतमाळ, त्रैमासिक मुक्तमंथन भुमिका मांडणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ सिंधुताई खंदारे आणि प्रा डॉ अनिल सिनगारे यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमानंतर आंबेडकरवादी कविता : एक चर्चा……! अंतर्गत विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांच्या ‘फेरफार ‘ आणि प्रफुल्ल धामणगावकर यांच्या ,’ कविता नागवंशाच्या ‘ या कवितासंग्रहावर काव्यविवेचन होणार आहे.प्रा डॉ सा द सोनसळे आणि प्रा डॉ कीर्तीकुमार मोरे हे काव्यविवेचन करणार आहेत. सुत्रसंचालन बालाजी तुरेवाले करणार आहेत.
शेवटी निमंत्रीतांचे कविसंमेलन होणार आहे. यात नामदेव राठोड, अंकुश सिंदगीकर, सतिश नाईकवाडे, बालाजी वाघमारे, प्रफुल्ल धामणगावकर, प्रा मारोती कसाब, प्रा भगवान आमलापुरे, प्रा ज्ञानेश गायकवाड, प्रा ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, बालाजी मुंडे, प्रा ज्ञानेश कांबळे, रामदास कांबळे, दिलीप गायकवाड, वर्षा माळी, बाबासाहेब वाघमारे, विनय ढवळे, सुभाष साबळे आणि संजय रायभोळे सहभागी होणार आहेत. कविसंमेलनाचे अध्यक्ष विद्रोही कवी राजेंद्र कांबळे आहेत तर सुत्रसंचालन रंजना गायकवाड आणि प्रा डॉ व्यंकट सुर्यवंशी करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक मा बा ह वाघमारे, मा वेणूताई जोगदंड, मा बालाजी तुरेवाले, मा प्रभाकर कांबळे आणि प्रफुल्ल धामणगावकर यांनी केले आहे.