कंधार ; दिगांबर वाघमारे
नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर संगारे यांच्या नावे कंधार येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते अंतिम सामना २६ मे रोजी झाला त्या सामन्यात सरपंच इलेव्हन बिजेवाडी विरुद्ध युवा मुंबई क्रिकेट क्रिकेट क्लब मुंबई यांच्यात सामना झाला या सामन्यात सरपंच इलेवन बिजवडी यांनी यांनी सामना जिंकत प्रथम पारितोषिक पटकावले रोख रक्कम दोन लक्ष रुपये व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला
या वेळी पुढे बोलताना खा चिखलीकर म्हणाले की नांदेड येथिल स्टेडियम साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 42 कोटी रुपये दिले त्यामुळे नांदेड येथील स्टेडियम उच्चप्रतीचे झाले त्याचप्रमाणे कंधार येथील सर्व सोयींनी युक्त क्रीडांगण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे व खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करेल असे ते यावेळी म्हणाले.
त द्वितीय पारितोषिक युवा मुंबई क्रिकेट क्लब मुंबई यांनी पटकावले तर तृतीय पारितोषिक सेना ईलेव्हन मुखेड यांनी पटकावले, उत्कृष्ट झेल आदित्य ग्रुपवार मेडिमिक्स इलेव्हन पानभोसि, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रमण आवाळे मैफिल बॉईज कंधार ,उत्कृष्ट गोलंदाज फरान सरपंच इलेव्हन बिजेवाडी, उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर सामनावीर साहेबाज सरपंच इलेव्हन यांना हा बहुमान मिळाला सर्व विजेत्या संघास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
यावेळी भाजपा महानगर चे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले ,मिस इंडिया सीमा कदम,जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटिल चिखलीकर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अड किशोर देशमुख, महानगराध्यक्ष संजय घोगरे ,जिल्हा सरचिटणीस विजय गंभीरे ,सरचिटणीस व्यंकटराव मोकले,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, तालुका सरचिटणीस किशन डफडे, माजी उपनगराध्यक्ष जफर उल्ला खान ,माजी नगरसेवक कृष्णा पापिंनवार ,सोशल मीडिया प्रमुख राज यादव, शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजाहंस शहापुरे ,माजी नगराध्यक्ष चेतन केंद्रे, शहर सरचिटणीस मधुकर डांगे, राजहंस शहापुरे , रजत शहापुरे, गोरे ,माजी नगरसेवक हनुमंत डुमणे ,राजू मुकनर,व्यंकट नागलवड, संभाजी घुगे,यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले तर मिस इंडिया सिमा कदम,प्रवीण साले यांनी मनोगत व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी
समीर चाऊस ,भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,युवमोर्च्या जिल्हाउपाध्यक्ष निलेश गौर,साईनाथ कोळगिरे,आसिफ शेख,बंडू पाटील वडजे, रमण आवाळे ,सय्यद मुजाहिद ,जमीर लाला, सय्यद नदीम ,शेख अफरोज ,समीर खादिम ,अड सागर डोंगरजकर ,प्रवीण बनसोडे, रवी संगेवार, रामदास बाबळे, सुमित गोरे ,शंतनू कैलासे, प्रवीण बनसोडे,गणेश उगले , गनहंसआदीं परिश्रम घेत आहेत, या सामन्यान मध्ये पंच म्हणून भरत चव्हाण ,मोइन सर यांनी चोख भूमिका बजावली तर समालोचक अब्दुल हापिज खान ,शंतनु कैलासे ,हे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली हि स्पर्धा पाहण्यासाठी कंधार पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.