सरपंच इलेव्हन क्रिकेट टीम बिजेवाडी कंधार च्या संघाने पटकावला खासदार क्रिकेट चषक

कंधार ; दिगांबर वाघमारे

महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर , माननीय खा.सुधाकर श्रृंगारे युवा नेते मा श्री प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कंधार येथिल खासदार क्रिकेट चषक स्पर्धेचे पहिले बक्षिस व ट्रॉफी सरपंच इलेव्हन क्रिकेट टीम बिजेवाडी ता कंधार ने पटकावत चषकावर नाव कोरले तर युवा मुंबई क्रिकेट क्लब मुंबई या संघास दुसरे बक्षिस मिळाले .

कंधार येथे झालेल्या खासदार चषक स्पर्धेतील अंतिम सामन्याचा सर्व क्रीडाप्रेमींनी दि२६ मे रोजी रात्री आनंद घेतला.

कंधार शहरात पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटचे सामने प्रकाश झोतात खेळविण्यात आले खासदार चषक स्पर्धेतील अंतिम सामना युवा मुंबई क्रिकेट क्लब मुंबई, व सरपंच इलेव्हन क्रिकेट टीम बिजेवाडी या दोन संघात अंतिम सामना झाला .

कंधार लोहा सह नांदेड जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी या सामन्याचा आनंद घेतला .अंतिम सामना पाहण्यासाठी मिस इंडिया सीमा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती .

सदरील स्पर्धेचे पहिले बक्षीस 2,00,000 ₹ व सन्मानचिन्ह,तर दुसरे बक्षीस 1,00,000 ₹ व सन्मानचिन्ह,आणि तिसरे बक्षीस 50,000 ₹ व सन्मानचिन्ह.व अन्य अनेक प्रोत्साहनपर बक्षिसे दिले .

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व प्रवीण पाटील चिखलीकर मित्र मंडळाच्या वतीने अतिशय सुंदर,उत्कृष्ट नियोजनात खासदार चषक स्पर्धा श्री शिवाजी कॉलेज च्या बाजूला क्रीडा संकुल शिवाजीनगर नवरंगपुरा ता. कंधार जि. नांदेड येथे झाली.

खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी महिलांचे ही क्रिकेट सामने घ्यावे असे प्रतिपादन मिस इंडिया सीमा कदम यांनी कंधार येथिल खासदार क्रिकेट चषक बक्षिस वितरण प्रसंगी दि.२६ मे रोजी रात्री केले .यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून नव तरुणांना प्रेरणा दिली असून आयोजक जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखली कर यांचे ही त्यांना आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *