कंधार ; प्रतिनिधी
नगर नालीकेच्या हद्दीतील नागरीकांना नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सदरील पाणी पुरवठा हा दोन दिवस आड करण्यात येतो. म्हणजेचे एका महिन्यात केवळ आठ दिवस पाणी पुरवठा करण्यात येतो. नगर पालिकेकडुन एका महिन्याचा पाणी पट्टीचा दर 100 /- रुपये आकरण्यात येतो, मात्र दिनांक 1 जुन 2022 पासुन नगर पालिका प्रशासनाणे पाणी पट्टी दर वाढवला आहे. सदरील पाणी पट्टीकर महिना 200/- रुपये केला आहे.
कंधार शहरातील नागरीकांना एका महिन्यात केवळ आठ दिवस पाणी पुरवठा होत असताना 200 /- रुपये पाणी पट्टी कर वसुल करणे हे अन्यायकारक आहे.
अगोदरच कंधार वासियांना पिण्याचे पाणी अशुध्द मिळत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीक कोरोणा – 19 मुळे आणि महागाईमुळे आर्थीक संकटात सापडले आहे. त्यामुळे पाणी पट्टी दरात झालेली वाढ ही कंधार मधिल नागरीकांवर अन्याय करणारी आहे.
त्यामुळे नगर पालिका प्रशासनाणे पाणी पट्टी दरात केलेली वाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा नगर पालिका प्रशासन विरोधात तिवृ अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .