कंधार प्रतिनिधी /ॲड.उमर शेख
दिल्ली येथे होणाऱ्या नववी राष्ट्रीय रॉकीट बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रियन संघाची सब ज्युनियर व ज्युनियर मुले व मुली या दोन्ही संघांची निवड चाचणी वसमत जिल्हा हिंगोली येथे पुर्णा प्रकल्प वसाहत वसमत मैदान येथे दिनांक 04-06-2022 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत एकूण मुले 29 व मुली 23 यांच्यात घेण्यात आली सदर निवड चाचणी महाराष्ट्र रॉकीट बॉल संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हसन शेख सर यांनी जमलेल्या सर्व खेळाडूंना रॉकीट बाॅल या खेळा विषयी सविस्तर माहिती देऊन खेळाचे महत्व पटवून दिले
तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत करावी व शरीराचा सर्वांगीण विकास करावा असं योग्य मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्हा रॉकीट बॉल संघटनेचे सचिव शेख नुर सर ,श्री कुदळे, सुनील माळवदकर ,संजय उबारे, सय्यद युनूस, शेख जब्बार ,शेख मोबीन , ॲड.उमर शेख या सर्वांच्या उपस्थितीत निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली.
या निवड चाचणी कार्यक्रमाचे संचालन फैयाज रेशमवाले यांनी केले व संजय उबारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आभार शेख नुर यांनी मानले.