शेकापूर च्या महात्मा फुले विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ; विशेष प्राविण्यात २६६ विद्यार्थी

कंधार ; महेंद्र बोराळे.

लातूर बोर्डाकडून घेण्यात आलेल्या मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत शेकापूर येथील महात्मा फुले विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन करून आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातून परीक्षा दिलेल्या एकुण २७१ पैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात विशेष प्राविण्य २६६ तर प्रथम श्रेणीत ५, विद्यालयाचा एकुण निकाल १०० टक्के लागला आहे.


विद्यालयातील बारावी कला शाखेचा ७० पैकी ७० विद्यार्थी उतीर्ण झाले. सदरील शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून या शाखेतून कु. वैष्णवी प्रभाकर गायकवाड ८३.५० टक्के, गणपती परशुराम मुंडे ८३.०० टक्के, कु. अंजली तिरुपती घुगे ८१.८३ टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे .


वाणिज्य शाखेतून ४५ पैकी ४५ विद्यार्थी उतीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकाल १०० टक्के लागला आहे. या शाखेतून कु. गंगासागर नंदकिशोर केंद्रे ७८.५० टक्के, कु. निकिता ज्ञानोबा केंद्रे ७६.५० टक्के, पुंडलीक रूकमाजी गित्ते ७६.३० टक्के) यांनी गुणानुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
विज्ञान शाखेतून १५६ पैकी १५६ विद्यार्थी उतीर्ण झाले. या शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून या शाखेतून कु. पूनम लक्ष्मण केंद्रे ८२.५० टक्के, कु. वर्ष प्रफुल कदम ८२.१७ टक्के, कु. जयश्री संजय पवार ८१.३३ टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. अशी माहिती शाळेकडून देण्यात आली.


सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपसभापती संभाजीराव पा.केंद्रे, सचिव तथा माजी सरपंच शिवाजीराव पा.केंद्रे, प्राचार्य एम.पी.केंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

या वेळी पर्यवेक्षक विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *