बहादरपुरा येथिल शेतकरी ताटीपामडे पिता-पुत्रांनी पेरणीसाठी तिफणीचे केले विधीवत पुजन

वृंताकन ; दत्तात्रय एमेकर

शनीदेव मंदिर गल्ली क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार येथील कष्टाळू शेतकरीराजा मृग नक्षत्र आरंभापासून पडल्या समाधानकारक पाऊस पडल्यानंतर तिफणं भरणीली प्रारंभ केले.आज १२ जुन २०२२ रोजी माझ्या गावात तांबोळी परिवाराच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहण्यास गेलो असता.प्रगतशील शेतकरी,आपल्या तुटपुंज्या अल्प शेतीत काबाडकष्ट करुन स्वाभिमानी संघर्षमय जीवन जगणारे मा.विठ्ठलराव जयवंतराव ताटीपामडे व त्यांचे चिरंजीव पिंटू विठ्ठलराव ताटीपामडे या पिता -पुत्रांनी पेरणीसाठी आपली तिफणीचे विधीवत समर्थ हस्ते पुजन करुन काळ्या आईच्या गर्भात बीज रुजविण्यासाठी तिफण या उपकरणाचे पुजन केले.

कविवर्य फ.मु.शिंदे म्हणतात. काळ्या मातीत मातीत तिफणं चालते,नंदीबैलाच्या जोडीला सदाशिव हाकलते.हे पुजन होतांना या तिफणं कवितेच्या ओळी आठवल्या शिवाय राहत नाहीत.मला या पावसाळ्यात हे दृश्य मनाला भावणारेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *