नांदेड
एम्प्टी माईंड इज डेव्हिल्स वर्कशॉप या इंग्रजी म्हणीप्रमाणे रिक्त मन हे भुताची कार्यशाळा ठरते. अनिवार्य व अप्रिय लॉकडाऊनच्या काळात देशप्रसिध्द स्तंभलेखक
तथा नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच विद्यार्थीह्रदयसम्राट इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर लिखित अंतर्नाद ही लेखमाला वाचण्यात आली.
अंतर्नाद ही प्रदिर्घ लेखमाला अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करुन मरगळलेल्या मनाला ताजेतवाने करणारी जीवनसंजीवनी ठरत असल्याची प्रतिक्रिया
आधार हॉस्पिटलच्या संचालिका व सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता संजय कदम यांनी दिली आहे.
अंतर्नाद वाचल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक होऊन संघर्ष करत प्रसंगाला सामोरे जाण्याची खंबीर मानसिकता घडते. कौटुंबिक सुसंवादाचे महत्त्व कळाल्यामुळे घराघरात
मुलांशी चर्चात्मक संवाद वाढला. कित्येक कुटुंबातील अबोला व दुराव्याची जागा निखळ प्रेम, मैत्री व सुसंवादाने.घेतल्याचा अनुभव आला. अंतर्नाद वाचून आलेल्या अनुभवावरून सर्वांना सांगावे वाटते की कँलनमँपल पब्लिशिंगमार्फत होणारा
इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर लिखित साहित्य संग्रह अंतर्नाद व शिवास्त्र प्रत्येकाने आवर्जून आपल्या संग्रही ठेवावा आणि प्रत्येक कुटुंबात त्याचे सामुदायिक वाचन करावे, असे शेवटी डॉ. स्मिता कदम यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.