सोनसळी बहावा…!


          सकाळी धुक्यात भिजलेली मदहोश पाहाट,पक्ष्यांची सुमधूर कुजबुज,फुलांचा दरवळणारा  मादक गंध,मन प्रसन्न करत होता…गुलाबी गारवा तनामनावर पांघरतांना अंग अंग शहारत….सहजच नजर खिडकीबाहेर गेली…

पिवळागर्द बहावा अगदि आंगोपांगी डवरला होता…त्यावर पक्ष्यांची मैफल सजली होती…पाहाताना भान हरखल..

.खरच,गुलाबी थंडीचा गारवा जाणवायला लागला की,निसर्ग रंग गंधीत फुलांच्या माला परिधान करतो.सर्वत्र फुलांनी मदमस्त डवरलेली फूल पाहिली की डोळ्यांच पारण फीटत.बहाव्याच्या गडदहिरव्या रंगात मन गुंतायला लागत.

बहाव्याला ३ते८पर्णिकेच्या जोड्या असतात.निसर्ग देवतेने त्याची रचना अगदि मनभावन केली आहे,वा-यावर मदमस्त पणे आपले फुलपंखी राजवैभव उधळतांना तो बेभान पणे बहरतो.बहाव्याच्या पिवळ्या फुलांना पाहातांना “पिवळे झूंबर”कुणी बांधले!हा प्रश्न मनात पडतो,बहाव्याला रात्रीला मंद सुगंध असतो.तो सुगंध हुगंताना मन वेडावत..

हा पानगळीचा वृक्ष असल्याने साधारण संपूर्णपणे यौवनाने मूसमूसलेला बहावा पाहाणे म्हणजे निसर्गातील अद्भुत  घटनांचे साक्षीदारच होणे होय.सध्या मात्र सर्वत्र बहावा फुललेला आहे.माझ्या माहेरच्या अगंणात तर बहावा ऐन भरात आहे.

सोनपिवळ्या कळ्यांनी लदबदलेलाअगदि नखशिकांत लावण्यात मूसमूसलेला. हळद लागलेल्या  राजबिंड्या राजकूमारासारखा . वा-याच्या झुळकेबरोबर अलवार झुलत आहे.बहावा बरोबर पांढरी शेवंती,काटेकोरांटी,अबोली,मोगरा,लांब दांडीची फूल,जाई,जूई,गुलाब यांना देखील बहार आहे.

फुलांना ओंजळीत घेउन त्यांचा क्षणभर गंध हुंगतांना मनात असंख्य आठवणीं रुंजी घालत गंधाळतात…तनामनाला प्रफुल्लीत करणारा

बहावा,

कीती ही पाहात राहावा वाटतो,मनातील सारी रुक्षता क्षणात नाहीसी करणारा,ओठावर मधुर हास्यांची लकेर उमटवणारा  हा

सोनसळी

बहावा…

मला मात्र खुप आवडतो.

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh


रुपाली वागरे/वैद्य

नांदेड ९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *