कंधार :- धोंडीबा मुंडे
दि 23/6/2022 गुरुवार रोजी कंधार कॉलेज ऑफ फॉर्मसी बाळांतवाडी कंधार चे प्रा.सौ पल्लवी रुपेश इंगोले यांच्या वाढदिवसानिमित धम निरजना विपसना सेंटर नांदेड येथे वृक्षारोपण व वृक्षवाटप केले. यामध्ये फळ झाड, चिकू. आंबा.फणस. मोसंबी.तुळसी.इ झाडे रोपे वाटप करण्यात आले. व लावली गेली या मध्ये प्रा रुपेश इंगोले व प्रा सौ पल्लवी इंगोले स्वतः वृक्षरोपण केले,हे
सुरुवाती पासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे,ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की झाडे लावा झाडे जगवा.जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्यामुळे प्रदुषण कमी होईल, पाऊस ही चांगला पडेल व काही प्रमाणात शेतकर्यांची आत्महत्या होणार नाही.यातून असे दिसून येते,की
प्रत्येकांनी प्रत्येकाच्या वाढदि वसा निमित किमान एक तरी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करावे व पर्यावरणाचे समतोल राखुन वाढदिवस साजरा करावा.