कंधार ; प्रतिनिधी
आरक्षणाचे जनक बहुजनाचे राजे , लोक राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26 जुन रोजी कंधार येथील विद्या विकास प्राथमिक शाळेत व बौद्धविहार येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व विहार समिती कंधार तर्फे बौद्धविहार येथे येथे आज सकाळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार , आनंदराव कांबळे , नारायण जोंधळे , चंद्रकांत फुके , माधवराव कांबळे , विठ्ठल ढवळे ,सचिन पट्टेकर , बालाजी कांबळे , महेंद्र अण्णा व बौध्दाचार्य विलास कांबळे , विनोद कांबळे आदीची

तर कंधार येथील विद्या विकास प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राजहंश शाहपुरे , गोलेगाव चे माजी सरपंच काशिनाथ फुले यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला .

