कंधार ; प्रतिनिधी
स्वतंत्र भारताच्या इतिहासात ज्यावेळी लोकशाही पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला या भारता वर राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणीबाणी लादली त्यामुळे देशवासीयांचे अतोनात हाल झाले तरी पण लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीयांनी लढा दिला असे प्रतिपादन माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी आणीबाणी निषेध दिनी कंधार येथे केले .
लोकतंत्र सेनानी संघ जिल्हा नांदेड च्या वतीने २६ जून २०२२ रोजी कंधार येथील नगरेश्वर मंदिर येथे आणीबाणी निषेध दिन काळ्या दिवसानिमित्त आणीबाणी सेनानीचा एकत्रीकरण संमेलन घेण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुनाथरावजी कुरुडे ,बाबुरावजी गंजेवार ,लोकतंत्र सेनानी संघाचे प्रांत उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दत्तोपंत देबडवार, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत कुलकर्णी , यांची उपस्थिती होती या वेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार कुरुडे यांनी आणीबाणीच्या काळातील कडू प्रसंगाचं वर्णन केलं कोणी कितीही मनामध्ये आणलं तरी लोकशाही आणि संविधान यांना पराभूत करू शकत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आणीबाणीचा काळ व त्याविरुद्ध केलेला संघर्ष आणि सत्याग्रह आहे असे ते म्हणाले
तसेच या कार्यक्रमावेळी बाबुरावजी गंजेवार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना म्हणाले की जो व्यक्ती इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही म्हणून इतिहासामध्ये अनेक काळे दिवस ,काही काळे क्षण आलेले आहेत त्याच्यातून बोध घेऊन नवनिर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तोपंत देबडवार यांनी केले तर आपल्या आणीबाणी काळातील भावना लक्ष्मणराव कुलकर्णी ,बालाजीराव गिरे ,भगवानराव आनेराव ,यांनी आपल्या मनोगत मनोगतातून व्यक्त केले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार , शिवा मांमडे, अनिल नातू ,अड सागर डोंगरजकर ,कृष्णा बनसोडे, किशन कळणे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे आभार लोकतंत्र सेनानी संघाचे जिल्ह्याचे सचिव अनिल नातू यांनी मानले वंदे मातरम या गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी कंधार लोहा तालुक्यातील आणि आणीबाणी काळात ज्यांनी जेल भोगली असे आणीबाणीचे सेनानी माता-भगिनी उपस्थित होत्या..